फौजी वाॅरिअर्स मार्शल आर्ट सेंटर वरोरा च्या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड

45

वरोरा : क्रिडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, चंद्रपूर यांचे द्वारे ब्रम्हपूरी ईथे आयोजित, जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा – २०२४ – २५ मधील आष्टेडू आखाडा या क्रिडा स्पर्धेत, वरोरा येथील फौजी वाॅरिअर्स मार्शल आर्ट सेंटर च्या ०८ विद्यार्थी व १३ विद्यार्थीनी खेळाडूंनी विविध वयोगटात उत्कृष्ट प्रदर्शन करीत, विभागीय स्तरावर आपले स्थान पक्के केले.

.     १४ वर्षाखालील वयोगट मुले – रीतीक श्रीकृष्ण धवने, हर्ष अनिल गेडाम, अर्नव निशांत कोसमकार, शौर्य पवन कारेकार, तन्मय चंद्रकांत विरुटकर. १७ वर्षाखालील मुले -पियूश गजानन विंधाने, शंतनु विजय धवणे, शोन जितेंद्र दसूडे. तर १४ वर्षे खालील वयोगट मुली यामध्ये आराध्या संजय शंभरकर, किरण मनोहर गोचे, अवनी विनोद उमरे, भूमी नंदलाल टेमुर्डे, कृतीका हेमराज बेहरे यांची निवड झाली. तसेच १७ वर्षे वयोगट मुली या श्रेणीत वेदिका गुणवंत भोयर, सानिया राजेश आवारी, पद्‌मश्री नितीन झुरळे, देवी विलास परचाके, दुर्वाक्षी रवी बुजाडे, रिया समीश बावणे,
स्नेहा राजू आसुटकर, मोनीका गणेश सोनटक्के याची निवड झाली.

.     आष्टेडू आखाडा ही क्रिडा स्पर्धा शिवकालीन आखाडा / खेळ यावर आधारित असून या खेळात, लाठी – काठी, दांड – पट्टा, तलवार, भाला फिरविणे इत्यादी प्रकार प्रामुख्यानं खेळले जातात. शिवकालीन याचा मुख्य हेतू, सैनिकांना शारीरिक व मानसिक दृष्ट्या सबळ ठेवणे आणि वेळप्रसंगी शत्रू पासून स्व:रक्षण करणे हा होता. क्रिडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी अलीकडेच शिवकालीन आखाडा खेळाचा समावेश शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये केला आहे.

.     जिल्हा स्तरावर, विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या नेत्रदीपक कामगिरी बद्दल फौजी वाॅरिअर्स मार्शल आर्ट सेंटर चे गुरूजन सर्वश्री, डी एन खापनेसर, प्रविण चिमूरकर ( बी. एस. एफ.), रवी तुराणकर ( आर्मी ), गणेश लांजेवार (जिल्हा सचिव) , राजू नकवे, वैभव खारकर, , मुख्य प्रशिक्षक रवि चररकर, आश्विनी नरड, ईशा वर्भे, साक्षी पर्बत, घनश्याम खोंडे या सर्वांनी मुला – मुलींचे, याप्रसंगी आयोजित सम्मान कार्यक्रमात कौतुक करून विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.