Home सामाजिक लोकमान्य इंग्लिश मीडियम स्कूल च्या व्हॉलीबॉल संघाची नेत्रदीपक कामगिरी

लोकमान्य इंग्लिश मीडियम स्कूल च्या व्हॉलीबॉल संघाची नेत्रदीपक कामगिरी

1364

वरोरा : नागपूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय सतरा वर्षाखालील मुलींच्या शालेय व्हॉलीबाल स्पर्धेत वरोरा येथील लोकमान्य इंग्लिश मीडियम स्कूल च्या मुलींच्या व्हॉलीबल संघाने राज्यस्तरावर तृतीय स्थान पटकावीत क्रीडा क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले. याच संघातील कुमारी ईश्वरी विलास राऊत हिची महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली.

.      विजेत्या संघाचे सोमवारी वरोरा शहरातून मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले. विजेत्या संघातील खेळाडूंना लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष श्रीकृष्ण घड्याळपाटील, कार्यवाह प्रा. विश्वनाथ जोशी, ऍड दुष्यंत देशपांडे, वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन चे अध्यक्ष गजानन जीवतोडे, पिरके, अविनाश पुंड, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर, संदीप उईके क्रीडा मार्गदर्शक चंद्रपूर, सुनिल बांगडे, निखिल बोबडे क्रीडा मार्गदर्शक नागपूर, लोकमान्य इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य संजय आंबुलकर, क्रीडा शिक्षक दुष्यंत लांडगे गणेश मुसळे, वनश्री पालमाकुलवार तथा सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

error: Content is protected !!