Home सामाजिक प्रा. गुरुदास बल्की विद्यापीठस्तरीय सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्काराने सन्मानित

प्रा. गुरुदास बल्की विद्यापीठस्तरीय सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्काराने सन्मानित

1335

श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा ला तीन विद्यापीठ स्तरीय रासेयो पुरस्कार

राजुरा : राष्ट्रीय सेवा योजना, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, राष्ट्रीय सेवा योजना विभागा द्वारे देण्यात येणारा २०२३-२४ चा विद्यापीठ स्तरीय सर्वोत्कृष्ट रासेयो महाविद्यालय पुरस्कार श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथक व कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास दादाजी बलकी यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.एम. वारकड, उपप्राचार्य डॉ राजमोहम्मद खेरानी, कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बलकी, डॉ सारिका साबळे यांनी स्वीकारला.

.      हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर हा पुरस्कार आणि सन्मान कार्यक्रम अधिकारी प्रा. बलकी, इतर सहायक कार्यक्रम अधिकारी तसेच रासेयो स्वयंसेवकांनी मागील तीन वर्षात हाती घेऊन पूर्णत्वास नेलेल्या विविध उपक्रमाचे फलित आहे, हा सन्मान महाविद्यालयासोबतच प्रत्येक सक्रिय स्वयंसेवकांचा ही आहे असे गौरवोद्गार प्राचार्य डॉ वारकड यांनी काढले.

.      यावेळी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ मिलिंद बारहाते, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे कुलगुरु डॉ प्रशान्त बोकारे, प्र- कुलगुरू डॉ श्रीराम कावळे, रासेयो संचालक डॉ श्याम खंडारे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!