Home सामाजिक नवदुर्गा उत्सव मंडळ तर्फे रक्तदान शिबीर

नवदुर्गा उत्सव मंडळ तर्फे रक्तदान शिबीर

1329

वरोरा : नवदुर्गा उत्सव मंडळ गाडगेबाबा नगर टिळक वार्ड वरोरा च्या वतीने नवरात्र निमित्य रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

.       रक्तदान शिबिरामध्ये गाडगेबाबा नगर येथील २५ युवकांनी रक्तदान केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती राजेंद्र चिकटे, (उबाठा) शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे, शिवसेना जिल्हा प्रमुख (शिंदे गट) नितीन मत्ते यांनी शिबिरात भेट दिली व मार्गदर्शन केले. त्यांचे नवदुर्गा मंडळातर्फे स्वागत करण्यात आले.

.         या रक्तदान शिबिराचे नियोजन नवदुर्गा उत्सव मंडळ चे अध्यक्ष गणेश जायनाकर, उपाध्यक्ष महेश नरड, जगदीश पंधरे, हर्षल बाकडे, राकेश पंधरे, प्रीतम थूल, केतन बाकडे, पियुष पेंदाम, मयूर पिंपळकर, निखिल लोहकरे, समीर मेश्राम, आकाश पंधरे, पराग मालवीय, प्रथमेश हरणे, ओम वरभे, मयूर नरड, अनिकेत पंधरे, कार्तिक विरुटकर यांनी केले.

error: Content is protected !!