विविध मागण्यासाठी भारतीय मजदूर संघाचे क्षेत्रीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन

394

माजरी : कोल इंडिया लिमिटेड च्या अंतर्गत येणाऱ्या सर्व संबंधित कंपन्याच्या कोळसा कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी कोल इंडिया कंपनी व्यवस्थापन विरोधात अखिल भारतीय मजदुर संघाच्य वतीने धरणे आंदोलन वेकोली माजरी क्षेत्रात कुचणा क्षेत्रीय कार्यालयासमोर दिनांक 26 सप्टेंबर ला धरणे आंदोलन करण्यात आले.

.       अखिल भारतीय मजदुर संघाच्या वतीने कामगार सुरक्षा, CMPF मध्ये झालेल्या भ्रष्टाचार विरोधात दोशिवर कारवाही होण्याबाबत, आणि महिला सशक्तीकरण तसेच दुर्घटना झाल्यास कामगारांना १ करोड १५ लाख व ठेका कामगारांना ४० लाख दुर्घटना विमा देण्याबाबत यासहित 17 मागण्यासाठी चरण बध्द कार्यक्रम राबविण्यात आला. 1 ते 10 सप्टेंबर पर्यंत प्रत्येक कोळसा खाणी मध्ये कामगारांना जागृत करण्यासाठी द्वारसभा घेण्यात आल्या.

.       त्यानंतर 26 सप्टेंबरला वेकोलितील सर्व क्षेत्रीय कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले त्यानंतर 30 सप्टेंबर ला नागपूर येथे वेकोली मुख्यालयासमोर आपल्या मागण्यासाठी विशाल धरणे आंदोलन करण्यात येणार आहे त्यासाठी कोळसा कामगार मोठ्या प्रमाणावर आपल्या अधिकार आणि हक्क अबाधित ठेण्यासाठी व कोल इंडिया कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात आंदोलन होणार आहे.

.       या कुचना क्षेत्रीय कार्यालय समोर झालेल्या धरणा आंदोलनात वणी माजरी क्षेत्राचे (BMS) अध्यक्ष चंद्रप्रकाश रांगडहाले, मंत्री महेश श्रीरंग, मोरेश्वर आवारी, भास्कर पिंपलकर, गजानन निमकर, संदीप आवारी, लकी सिंह, राजू मांडवकर, संजीव बावणे, होमेंद्र तुरकर, अखिल द्रविड सोबत मोठ्या प्रमाणात कोळसा कामगार उपस्थित होते व जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत लढण्याचा निर्धार यावेळी अखिल भारतीय मजदूर संघाच्या वतीने कोळसा कामगारांच्या अधिकारासाठी लढत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.