नागभिड येथे भारतीय बौध्द महासभेच्या बैठकीचे आयोजन

447

नागभीड : बौद्ध धम्माचा प्रचार आणी प्रसार व धम्माची चळवळ गतीमान व्हावी या उदात्त हेतूने मागिल अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या भारतीय बौध्द महासभा शाखा तालुका नागभिडची कार्यकारणी गठिण करण्या संदर्भात २ ऑक्टोबरला आंनद बुध्द विहार नागभिड येथे दुपारी १२ वाजता बैठकिचे आयोजन करण्यात आले आहे.

.      भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा पुर्वचे अध्यक्ष डॉ. राजपाल खोब्रागडे यांचें नेतृत्वात मागिल अनेक वर्षांपासून धम्माची चळवळ गतीमान करण्यासाठी गावागावात भारतीय बौध्द महासभेच्या शाखा तयार करण्यात येत असून त्या अनुषंगाने तालुका शाखा नागभिडची कार्यकारणी गठित करण्यात येत आहे.

.     नागभिड तालुक्यातील संपुर्ण बौध्द उपासक, उपासिका, तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी, ग्राम पदाधिकारी, बौद्धाचार्य, केंद्रिय शिक्षक, शिक्षिका, सर्व सैनिक संस्थेचे हितचिंतकानी (ता.२ ऑक्टोबर) ला ठिक १२ वाजता आंनद बुध्द विहार नागभिड येथे उपस्थित रहावे असे आवाहन तालुका संघटक श्याम रामटेके तथा चंद्रपूर जिल्हा पुर्वचे अध्यक्ष डॉ राजपाल खोब्रागडे यांनी केले आहे.