सिंदेवाही नगरपंचायत मध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट बाबत जनजागृती

408

सिंदेवाही : राज्याच्या विधानसभा निवडणूका तोंडावर असून प्रशासनाने त्यासाठी तयारी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’ बरोबर ‘व्हीव्हीपॅट’ मशिन वापरण्यात येणार आहे. याची माहिती नागरिकांना व्हावी म्हणून याबाबत प्रशासनाकडून १० सप्टेंबर पासून जनजागृती करण्यात येत असून नुकतेच तहसील कार्यालय कडून सिंदेवाही नगरपंचायत मध्ये ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट बाबत जनजागृती करण्यात आली.

.        तहसील कार्यालय सिंदेवाही कडून आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी झाली असून ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट बाबत सर्वकष प्रसार, प्रसिद्धी होण्याच्या दृष्टीने तालुक्यातील ठिकठिकाणी जावून ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. दरम्यान २५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता नगरपंचायत सिंदेवाही येथे ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ चे शहरातील नागरिकांना प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी सागर वाहने, नायब तहसिलदार मंगेश तुमराम, मंडळ अधिकारी राहुल तोडसाम, निखाते, गेडाम, रोशनी कोल्हे, तलाठी- मळगे, गुंजाळ, ताकसांडे, खरकाटे, फुलझेले दिशा दुधे, धनश्री कनाके, राजेश कनाके इ. उपस्थित होते. सदर प्रात्यक्षिक सिंदेवाही तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये दाखविण्यात येत असल्याचे सिंदेवाही तहसीलदार संदीप पानमंद यांनी सांगितले आहे.