येवती साजातील गारपीट ग्रस्त शेतकरी नुकसानभरपाई पासून वंचित

13

तलाठ्याच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी वंचित : गावकर्‍यांचा आरोप

वरोरा : मागील वर्षी झालेल्या गारपीट व मुसळधार पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत महसूल विभागाच्या वतीने मोका पंचनामा करण्यात आला. आणि शेतकर्‍यांना नुकसान भरपाई सुद्धा मिळाली. मात्र येवती साजातील शेतकर्‍यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. याला येवती साजातील तलाठ्याचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरला असल्याचा आरोप अभिजीत कुडे व गावकर्‍यांनी केला.

.       वरोरा तालुक्यात खरीप हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड करतात. सोयाबीनचे पीक काढल्यानंतर रब्बी हंगामात होणारी पिके म्हणून चणा, गहू या मुख्य पिकाची लागवड करतात. चणा व गहू चे पीक तुर्‍यावर आले असतांना अचानक अवकाळी, मुसळधार पाऊस व गारपीट पडले. यात डौलात असलेले पिके पूर्णता जमीनदोस्त झाले. याची दखत घेत महसूल विभागाच्या वतीने सर्वे करण्यात आला. व तळठ्यांच्या मार्फत मोका पंचनामा करण्यात आला. शासनाने नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिली. या नुकसान भरपाईत येवती साजातील नागरी, उखर्डा, येवती, केळी, वाघनख या पाच गावातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. याबाबत शेतकर्‍यांनी संबंधित विभागाला माहिती देत निवेदने दिली. मात्र प्रशासणणे शेतकर्‍यांच्या निवेदनाची दखल घेतली नाही. तालुक्यातील बाकी भागातील पंचनामे होऊन शेतकर्‍यांना मदत मिळाली पण निवेदन देऊन देखील निव्वळ तलाठी यांच्या आडमुठेपणा पंचनामे केले नाही त्यामुळे नागरी, उखर्डा, येवती, केळी, वाघनख  गावातील शेतकरी नुकसानभरपाई पासून वंचित राहिला आहे.  निवेदन देऊन देखील वारंवार  तक्रारी करूनही तलाठी यांच्या हलगर्जीपणा मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  प्रशासनाने दखल  घेऊन शेतकर्‍यांना न्याय द्यावा अन्यथा शेतकरी आक्रमक भूमिका घेणार आहे.

.       संबंधित तलाठी साजा वर हजर राहत नाही. व शेतकर्‍यांचे फोनही उचलत नसल्याचा आरोप कुडे यांनी केला असून याबाबत  अनेक तक्रारी करून देखील प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहेत. नुकसान होऊन देखील त्यांना पंचनामे करण्यास अडचण काय, निवेदन देऊन देखील पंचनामे करण्यात का आले नाही, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे याला जबाबदार कोण? तात्काळ शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी व तलाठी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करून शेतकर्‍यांना मदत द्यावी अन्यथा शिवसेना आक्रमक भूमिका घेवून तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असा इशारा विधानसभा प्रमुख युवासेना अभिजित कुडे यांनी दिला आहे.