तलाव दुरुस्ती साठी निधी मंजूर करून द्या

239

शेतकर्‍यांची मागणी

वरोरा : तालुक्यातील भटाळा येथे पुरातन काळातील प्रसिद्ध असलेले कळसा विना भोंडा महादेव मंदिर आहे. भटाळा या गावामध्ये सरकारी मामा तलाव आहे. हा तलाव 99 एकर जागेवर आहे. या तलावामध्ये अतिक्रमण केले आहे. या तलावाचा मुख्य कालवा तीन किलोमीटर असून दरवर्षी तो 7 ते 8 ठिकाणवून फुटतो. मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यामुळे दरवर्षी या तलावाचे काम शेतकरी श्रमदान मधून करत आहे. याबाबत शेतकरी यांनी शासनाकडे तक्रारी करूनही शासनाने योग्य ती कारवाई केली नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहे.

.      पाण्याखाली येणार पीक 300 हेक्टर आहे. शेतकर्‍यांनी श्रमदानामधून तलावाच काम केले नाही तर शेती साठी लावलेला लाखो रुपये खर्च वाया जाईल म्हणून शेतकरी स्वतः काम करीत आहे. याबाबत सरकार कडे तक्रारी केल्या तर पैसे नाही म्हणून याकडे काना डोळा करत असतात. या तलावापासून सरकारला काहीच फायदा नाही म्हणून संबंधित तलावाकडे प्रशासन लक्ष देत नाही. शेतकर्‍यांनी शासनाला मागणी केली आहे की माझ्या पत्नीला लाडकी बहीण योजना देऊ नका पण आमचा जीवन ज्या शेतीवर आहे. तिला पाणी पोहचले नाही तर आमच्या उपासमारीची वेळ येईल.  म्हणून तलाव दुरुस्ती साठी निधी मंजूर करून द्या. अन्यथा आम्ही शेतकरी त्याच तलाव मध्ये जलसंमाधी आंदोलन करू. अशा इशारा आपत्ती ग्रस्त शेतकरी तसेच शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी सरकारला दिला आहे.