विषारी औषध प्राशन करून पारडी येथील शेतकर्‍याची आत्महत्या 

136

वरोरा : सतत ची नापिकी व या वर्षी सुद्धा सोयाबीन पिकावर येलो मोझ्याक रोगाने आक्रमण केल्याने आता उत्पन्नात घट होणार या विंवचनेत असलेल्या शेतकर्‍याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना वरोरा तालुक्यातील पारडी येथे बुधवारी दि 11 सप्टेंबर ला सायंकाळी 4 वाजता सुमारास घडली. गजानन माधो जुनघरे असे शेतकर्‍याचे नाव आहे.

.      तणनाशक औषध घेऊन आत्महत्या करण्याचे  प्रयत्न केले होते. मात्र कुटुंबातील काही सदस्य यांच्या सतर्कतेने त्याला जिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकुर्ती मध्ये काहीच सुधारणा झाली नसल्यामुळे पहाटे चार वाजता शेतकर्‍याची प्रांनज्योत मावडली. यामुळे त्यांचे दोन मुले, पत्नी, आईवडील पोरके झाले आहे. त्यांच्या कडे चार एकर कोरडवाहू शेती असून त्यांच्यावर पंजाब नॅशनल बँक वरोरा, येथील 1 लाख 16 हजार तर गावातील गटाचे स्वतंत्र बँक फायन्स वरोरा चे 50 हजार आणि अन्नपूर्णा बँक चिमूर चे 30 हजार असे कर्ज असून गावातील स्वतंत्र बँक फायन्स चे एजंट घरी पैसे मागायला आल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे नातेवाईक यांनी सांगितले आहे.