Home सामाजिक सिंदेवाहीत भारतीय बौध्द महासभेच्या तालुका कार्यकारिणीची निवड

सिंदेवाहीत भारतीय बौध्द महासभेच्या तालुका कार्यकारिणीची निवड

1350

तालुकाध्यक्ष अंबादास कोसे तर महिला तालुकाध्यक्षपदी शुभांगी खोब्रागडे

सिंदेवाही : बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा. आणि धम्माच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करावा, यासाठी तमाम बौद्धांची मातृसंस्था असलेली भारतीय बौध्द महासभा देशभरात काम करीत असून राज्यामध्ये नुकत्याच भारतीय बौध्द महासभेच्या कार्यकारिणी तयार करण्यात आल्या आहेत. दरम्यान भंते शोभित् मैत्रेय बुद्ध विहार सिंदेवाही येथे भारतीय बौद्ध महासभेच्या विविध विभागाच्या कार्यकारिणी पुनर्गठीत करण्यात आल्या असून तालुकाध्यक्ष अंबादास कोसे, महिला तालुकाध्यक्षा शुभांगी सूर्यजीत खोब्रागडे, सिंदेवाही शहर तालुकाध्यक्ष सिद्धार्थ रंगारी, यांची निवड करण्यात आली.

.      भारतीय बौद्ध महासभा जिल्हा पूर्व चे जिल्हाध्यक्ष डॉ.राजपाल खोब्रागडे यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील आठ तालुक्यात तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली असून सिंदेवाही तालुकाध्यक्ष अंबादास कोसे, सरचिटणीस प्रा.जगदीश सेमस्कर, कोष्याध्यक्ष भैयाजी नीमगडे, संस्कार विभाग उपाध्यक्ष कोमल गेडाम, प्रचार पर्यटन उपाध्यक्ष तथागत कोवले, संरक्षण विभाग उपाध्यक्ष शेषराव अंबादे, कार्यालयीन सचिव धनोज खोब्रागडे , कार्यालयीन सचिव डॉ. प्रवीण डांगे, विविध विभागाचे सचिव म्हणून मुन्ना बारसागडे, भीमराव खोब्रागडे, कुणाल शंभरकर, सुनील बोरकर, सुरेश गोवर्धन, सदाशिव शेंडे, तर तालुका संघटक म्हणून बलदेव चाहांदे, महेंद्र कोवले, श्रावण नागदेवते, खेमचंद खोब्रागडे, भीमराव खोब्रागडे, यशवंत राऊत, भैयाजी मानकर, यांची निवड करण्यात आली. तर महिला तालुकाध्यक्ष शुभांगी सुर्यजीत खोब्रागडे, सरचिटणीस प्राजक्ता विनय खोब्रागडे, कोषाध्यक्षा मीनाताई बेदले,

.      संस्कार विभाग उपाध्यक्ष रीता पोपटे, प्रचार पर्यटन उपाध्यक्षा पौर्णिमा सिद्धेश डांगे, संरक्षण विभाग उपाध्यक्षा शोभा खोब्रागडे, कार्यालयीन सचिव नलिनी रामटेके, हिशोब तपासनीस सुजाता चाहांदे, तसेच विविध विभागाचे सचिव म्हणून करुणा सहारे, प्रतिभा मेश्राम, धाराताई चाहांदे, विशाखा पाटील, तर तालुका संघटक म्हणून सुजाता मेश्राम, मंदा बनसोड, शांताबाई पाझारे, सुलोचना रामटेके, मायाबाई खोब्रागडे, संयोगिता गेडाम, रंजना चूनारकर, सिंदेवाही शहराध्यक्ष सिद्धार्थ रंगारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजपाल खोब्रागडे, सरचिटणीस लोमेश खोब्रागडे, संस्कार विभागाचे उपाध्यक्ष रमेश मानकर, केंद्रीय शिक्षिका विजया रामटेके, कॅप्टन मेश्राम, तसेच तालुक्यातील असंख्य उपासक, उपसिका उपस्थित होते.

error: Content is protected !!