नेरी जिल्हा परिषद क्षेत्रात आपद्ग्रस्तांना आ भांगडिया कडुन आर्थिक मदत

14

नेरी : चिमूर तालुक्यातील नेरी जिल्हा परिषद क्षेत्रातील नेरी सहित क्षेत्रातील विविध गावातील आपद्ग्रस्तना चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्याकडून औषध उपचारासाठी, शस्त्रक्रिया करण्यासाठी, उपचाराला जाण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येऊन त्यांच्या कुटूंबाला एक हात मदतीचा पुढे करीत आधार देण्यात आला.

.       नेरी जिल्हा परिषद क्षेत्रातील बूथ अध्यक्षानी व कार्यकर्त्यांनी गावातील आपद्ग्रस्तच्या समस्या भारतीय जनता पक्षाचे चिमूर तालुका अध्यक्ष राजू झाडे यांना कळविल्या आणि सदर आपद्ग्रस्तना मदत करणे हे महत्वाचे असून पटवून दिले असता तालुका अध्यक्षांनी तात्काळ सर्व समस्या आमदार भांगडिया यांना सांगितल्या तेव्हा आमदार बंटी भांगडिया यांनी तात्काळ मदत देण्याचे आदेश दिले. यात नेरी येथील केजराज श्रावनजी पंधरे यांना औषध उपचार करण्यासाठी मदत देण्यात आली तर नेरी येथील गुणाबाई घनश्याम दडमल याना अपघात झाल्याने औषध उपचारासाठी मदत देण्यात आली. सिरपूर येथिल सुरेखा माधव निकोडे यांना औषध उपचारासाठी मदत देण्यात आली ज्ञानेश्वर विश्वनाथ डहारे यांना कॅन्सर रोगावर औषध उपचारासाठी मदत करण्यात आली रमेश तुळशीराम निकोडे यांना कॅन्सर रोगावर औषध उपचारासाठी मदत देण्यात आली तर मुखरू बाबुराव आदे यांच्या घराची भिंत पडल्याने आर्थिक मदत करण्यात आली हे सर्व सिरपूर येथील रहिवासी आहेत तर लोहारा येथील दुर्गाबाई सीताराम खोब्रागडे पोटाच्या आजारा च्या उपचारासाठी मदत देण्यात आली तर बोथली येथील सुनीता शंकर नागपुरे यांना हुंदय रोग तपासणीसाठी मदत देण्यात आली तर लावारी येथील रत्नपाल विठोबा श्रीरामे यांना घर पडल्याने मदत देण्यात आली शिवनपायली येथील वामन लहुजी बोरकर यांचा मुलीच्या शस्त्रक्रिया साठी आर्थिक मदत देण्यात आली अश्याप्रकारे या सर्व आपद्ग्रस्तना मदत देण्यात आली.

.        या सर्व आपद्ग्रस्तनी आमदार बंटी भांगडिया चे आभार मानले आहे कारण अगदी वेळेवर देवदूता सारखी मदत केल्याने आभार मानले आहे सदर लाभार्थ्यांना घरपोच मदत तालुका अध्यक्ष राजू पा झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ भाजपा नेते रमेश कंचतलवार यांच्या नेतूत्वात देण्यात आली यावेळी कन्हैया सिंग भौन्ड योगेश सहारे, विलास कोराम, महामंत्री भाजपा प्रत्येक गावातील बु अध्यक्ष तसेच भाजपा कार्यकर्ते व गावकऱ्याच्या उपस्थितीत मदत वितरित करण्यात आली