अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

13

कोठारी : कोठारी पोलिस स्टेशन हद्दीतील देवई फाट्यासमोर बल्लारपूर – गोंडपिपरी राष्ट्रीय महामार्गावर मोटरसायकलस्वारास अज्ञात वाहनाने रविवार दि. १५ सप्टेंबर ला सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वारा सह 1 जण गंभीर जखमी झाले. संतोष गेडाम (४५) व अंकुश बुरेवार (२७) रा जोगापूर असे जखमींची नावे आहेत.

.       या अपघातातील दोन्ही जखमीना कोठारी पोलीस घटनास्थळावर धाव घेऊन त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र कोठारी येथे उपचारार्थ दाखल करून पुढील उपचार साठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रवानगी करण्यात आले. कोठारीवरून जोगापूर कडे दुचाकी क्र.एम.एच.३४ ए वाय ४८६१ने जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाने धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीस्वार दोघेही गंभीर जखमी अवस्थेत पडून होते. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिस अधिकारी हे घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला अज्ञात वाहनाचा शाेध सुरू आहे. पुढील तपास ठाणेदार योगेश खरसान करीत आहेत. दोन दिवसात लगातार दोन अपघात झाल्याने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे.