गुणवत्तापूर्ण दर्जा राखून क्षेत्रातील विकास कामे तातडीने पूर्ण करा – विजय वडेट्टीवार

45

ब्रम्हपुरी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश

चंद्रपुर : ब्रह्मपुरी क्षेत्राचा एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत अधिकारांना न्याय देण्यासाठी व त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावरून मी कोट्यावधींचा विकास निधी खेचून आणला. या विकास निधी अंतर्गत ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात मंजूर व प्रलंबित विकास कामे गुणवत्तापूर्ण दर्जा राखून तातडीने पूर्ण करा. असे निर्देश राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी येथील आयोजित आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.

.        आयोजित आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी पर्वनी पाटील, तहसीलदार सतीश मासाळ, मुख्याधिकारी अर्शिया जुही, काॅंग्रेस तालुकाध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, सिंदेवाही काॅंग्रेस तालुकाध्यक्ष रमाकांत लोधे, माजी पं.स‌.सदस्य थानेश्वर कायरकर, तथा सर्व विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

.        यावेळी बैठकीचे अध्यक्ष विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी पंचायत समिती अंतर्गत घरकुल योजना, मनरेगा विकास कामे, बांधकामे, तसेच वीज वितरण कंपनी मार्फत घरगुती वीज पुरवठा, शेतकऱ्यांना वीज पुरवठा प्रकरणे, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चालू स्थितीतील प्रलंबित व प्रस्तावित विकास कामे, तसेच तीनही तालुक्यातील ग्रामपंचायती अंतर्गत सुरू असलेली विकास कामे, क्षेत्रातील जिल्हा परिषद सिंचाई विभाग व गोसेखुर्द प्रकल्प मार्फत क्षेत्रातील सिंचन व्यवस्था, कृषी विभागा कडून पिक विमा मोफत बियाणे योजना व पाणीपुरवठा योजना, शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या बस फेऱ्या व इतर योजनांच्या विस्तृत आढावा घेतला. यावेळी काही विभागाच्या अधिकाऱ्यांचीअनुपस्थिती यावरून व अपूर्ण माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चांगले धारेवर धरले.

.        तर आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वीच नागरिकांच्या समस्यांना पूर्णविराम देणे हेतू विकास कामांच्या बाबतीत कुठलीही हयगय व दिरंगाई न करता अधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागून विकास कामे पूर्णत्वास आणावी. व नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवाव्या असे निर्देश यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिले. ही विकास कामे करताना कंत्राट दाणा करून गुणवत्ता पूर्ण दर्जा राखूनच विकास कामे करावे. असेही त्यांनी अधिकाऱ्यांना आवर्जून सांगितले.