नेरी : चिमूर तालुकयातील वंदनीय राष्टसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमीत ग्रामजयंती प्रचार व प्रसार समितीच्या वतीने ८ सप्टेंबरला ऋषीपंचमी च्या दिवशी तपोभूमी गोंदेडा येथे एकदिवसीय चिंतन कार्यशाळा गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
. ऋषीपंचमीच्या शुभ दिनी चिमूर तालुक्यातील अनेक गावांतील कार्यकर्ते, प्रचारक,सेवक, तपोभूमीत मोठ्या संख्येने उपस्थित झाले. सर्वांच्या उपस्थित सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक विषयांवर मार्गदर्शन तसेच चर्चा करण्यात आली यानंतर सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. प्रार्थनेनंतर प्रत्येक कार्यकर्ता परिचय व कार्य आढावा चर्चासत्र घेण्यात आले.याप्रसंगी विठ्ठलराव सावरकर अध्यक्ष गुंफा समिती, अशोकराव चरडे ग्रामगीताचार्य, सुधाकर पिसे, नथ्थुजी भोयर, कोष्याध्यक्ष गुंफा समिती, बाबाराव दोहतरे, प्रा भास्कर वाढई सहसचिव गुंफा समिती यांनी विचार व्यक्त केले. रात्री सहभोजन करून भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये प्रामुख्याने हेमराज कापसे महाराज यांनी महाराजांच्या आवाजातील सुंदर भजने सादर केली व सोबत चरण पोईनकर महाराज,चौधरी महाराज,चनफले महाराज व अनेकांनी भजने गायली.
. 9 सप्टेबरला सामु.ध्यानावर चनफले महाराज यांनी चिंतन व्यक्त केले.व आध्यात्मिक चर्चासत्रात प्रा राम राऊत ग्रामगीताचार्य, डॉ श्याम हटवादे, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष चौधरी महाराज यांनी चिंतन व्यक्त केले व त्यानंतर लोणबोले यांनी मार्गदर्शनात श्रमदान सत्र घेण्यात आले व अल्पोपहार करुन सर्व मंडळीनी तपोभूमी चे निरोप घेतले सदर एकदिवसीय कार्यक्रमाला अनेक गावातील गुरुदेव भक्तांनी हजेरी लावली होती.
. या कार्यक्रमाच्या नियोजणाकरिता गजानन ठाकरे, अरविंद देवतळे, घनश्याम चाफले, आनंदराव कडुकार, टिकाराम वाघमारे, संजय ठाकरे, प्रकाश गोहणे, नितेश वाकडे, रुपेश धारणे, दिलीप नन्नावरे, वामण बोरकर, भरत जांभुळे, शंकर बावणे, धनराज चौधरी, किसन दांडेकर व सर्व कार्यकर्ते मंडळिंनी सहकार्य केले.


