नागभीड : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागभीडच्या वतीने पोलीस स्टेशन नागभीड येथें अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापणेसाठी पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
. समाजातील अंधश्रदेचे निर्मूलन करण्यासाठी सरकारी आदेशानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वतीने समितीचे अध्यक्ष हरिभाऊ घरफडे, सचिव अरुण पेंदाम, कार्याध्यक्ष अमृत शेंडे, शेषराव लोणारे वैज्ञानिक जानिवा प्रकल्प, आनंद मेश्राम विविध उपक्रम विभाग,आर. डी. रामटेकेवार्तापत्र व प्रकाशन विभाग, गीता खापर्डे उपाध्यक्ष,जास्वंदा रामटेके महिला विभाग,सपना खोब्रागडे, ज्योती खोब्रागडे यांनी नागभीडचे सहायक पोलीस निरीक्षक पोटभरे यांना निवेदन देण्यात आले.
. ड्रॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मृत्यूला अकरा वर्ष पूर्ण झाले आहे. त्यांचे स्मरण म्हणून राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महासंचालक ड्रॉ. छेरींग दोरजे यांच्या आदेशाने नरबळी आणी इतर अनिष्ट व अघोरीं प्रथा जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चटण करण्याबाबत अधिनियम 2013 च्या कलम 5(1) पोलीस आयुक्ताच्या कार्याशेत्रात सहाय्यक आयुक्त गुन्हे तसेच पोलीस अधीक्षकाच्या कार्यक्षेत्रात पोलीस निरीक्षक स्थानिक शाखा यांची दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याच्या अंमलबजावणी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तालुका कार्यकरणीने या पत्राच्या अनुसंगाने नागभीड पोलीस स्टेशनमध्ये कक्ष स्थापन करावा व त्याची माहिती जनतेसामोर जाहीर करावी जेणे करून पीडित लोक आपली तक्रार निर्भय पणे या स्वतंत्र कक्षकडे घेऊन येतील.