अखेर पीएचसी चौक ते बाजार चौक मार्गाच्या चौपदरीकरण कामाला सुरुवात

18

आ. भांगडीयांनी केली कंत्राटदाराची कानउघडणी

नेरी : चिमूर तालुक्यातील नेरी येथील प्रमुख मार्ग पी एच सी चौक ते बाजार चौक या मार्गाचे मागील अनेक दिवसांपासून काम रखडले होते. पावसाने संपूर्ण मार्ग खराब झाले. नेहमीची वाहतूक यामुळे मार्गाची अवदशा झाली. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तेव्हा नेरी येथील नागरिकांनी सदर बाब या क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांना कळविताच त्यांनी तात्काळ बांधकाम विभागास व कंत्राटदार कंपनी यांना सांगून तात्काळ काम करण्याच्या सूचना दिल्या आणि लगेच या चौकातील प्रमुख मार्गाचे चौपदरीकरण कामाला सुरुवात झाली.

.        नेरी येथील पीएचसी चौक ते बाजारचौक हा प्रमुख मार्ग आहे या मार्गाचे मागील पाच ते सहा महिन्यांपासून काम सुरू होते परंतु महत्वाच्या मार्गाचा काम थांबले होते अनेकदा नागरिकांनी याबाबत संबंधित विभागाला कळविले होते मात्र कुणीही लक्ष देत नव्हते या मार्गावर वाहने चालवणे कठीण झाले होते बांधकामामुळे मार्गात अनेक ठिकांनी खड्डे पडले होते या ठिकाणावरून रहदारी करणे कठीण झाले होते. तसेच मुख्य गावात व बाजारपेठ मध्ये जाणारा मार्ग असल्याने कसेही अनेक अडचणीला सामोरे जाऊन जावेच लागे तेव्हा मार्ग तयार करणारी कंपनी व बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याने नागरिकांनी सदर अडचण या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटी भांगडिया यांना सांगताच त्यांनी तात्काळ बांधकाम विभागाला व कंपनी कंत्राटदाराला सांगून तात्काळ काम करण्याचे निर्देश दिले. तेव्हा मार्गाच्या चौपदरीकरण कामाला सुरुवात झाली.

.        त्यामुळे नेरी वाशीय जनतेनी आमदार बंटी भांगडिया यांचे आभार मानून अभिनंदन केले सदर मार्गाच्या कामाची पाहणी डॉ. श्याम हटवादे, जेष्ठ नेते तथा भाजपा प्रदेश सद्स मनीष तुमपल्लीवार, भाजयुमो प्रदेश सचिव संदीप पिसे, भाजपा जी प प्रमुख तसेच अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. लवकरच काम पूर्ण होईल असे कंपनीच्या प्रवकत्यांनी सांगितले आहे.