चार वर्षात तोहोगाव ग्रामपंचायतला तीन उपसरपंच

17

पद वाचविण्यासाठी खामनकरांची फिल्डिंग 

अविश्वास प्रस्तावावर होणार चर्चा 

कोठारी : तोहोगाव ग्रामपंचायतच्या आठ सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी गोंडपिपरीचे तहसीलदार शुभम बाहाकर यांनी मंगळवारी १० सप्टेंबरला ग्रामपंचायत कार्यालयात सभा बोलावली आहे. उपसरपंच पद वाचविण्यासाठी खामणकर यांनिही कंबर कसली आहे. अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यास तोहोगाव ग्रामपंचायतीला चार वर्षात तीन उपसरपंच मिळणार आहे.अविश्वास प्रस्ताव पारित होणार की बाळगणार किंव्हा  मदन खामनकर उपसरपंच पदाचा राजीनामा देतात याची उत्सुकता आता गावाकऱ्यांना लागली आहे.

.     अकरा सदस्यीय तोहोगाव ग्रामपंचायत असून अविश्वास प्रस्ताव पारित होण्यासाठी दोन त्रित्यांश सदस्यांची गरज आहे.शुभांगी मोरे यांचेवर अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यानंतर ८ सप्टेंबर २०२३ ला तोहोगाव चे उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती.त्यात शेतकरी संघटनेचे मदन खामणकर हे बिनविरोध उपसरपंच म्हणून निवडून आले होते.अवघ्या एका वर्षात त्यांनी ग्रामपंचायत सदस्यांचा विश्वास गमावल्याने त्यांचेवर पाच सप्टेंबर ला सात ग्रामपंचायत सदस्य व सरपंच असे ऐकून आठ लोकांनी गोंडपिपरी तहसीलदार समोर अविस्वास प्रस्ताव दाखल केला होता.उपसरपंच झाल्यापासून त्यांनी नातेवाईकांना टेंडर देण्यासाठी सदस्यांवर नियमित दबाव आणायचे. टेंडर मिळाले कि मग तेच ग्रामपंचायत चे कामे करायचे असा आरोप ग्रामपंचायत सदयंकडून करण्यात आला आहे.अविश्वास पारित झाल्यास तोहोगाव वासियांना चार वर्षात तिसरा उपसरपंच पाहायला मिळणार आहे.तिसरा उपसरपंच कोण होणार याची उत्सुकता गावाकऱ्यांना आहे.

.     तोहोगाव ग्रामपंचायत मध्ये अकरा सदस्य असल्याने अविश्वास प्रस्ताव पारित होण्यासाठी दोन त्रिताऊंश म्हणजे आठ सदस्यांची गरज आहे.दोन्ही गटाकडून सरपंच अमावस्या ताडे यांची मनधरणी सुरु असल्याचे बोलल्या जात आहे.या वेळी सरपंचाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे.अकरा सदस्य असलेले तोहोगाव ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस चे तीन, भाजपा तीन,वंचित एक, शेतकरी संघटना  तीन, एक अपक्ष असे बलाबल आहे. ग्रामपंचायत मध्ये एका वर्षां पूर्वीच सरपंच व उपसरपंच यांचे वर अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता.त्यावेळी सरपंच अमावस्या ताळे यांचेवरील अविश्वास बारगळला पण उपसरपंच शुभांगी मोरे यांचे विरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित झाला होता.

    “मी गावाच्या विकासासाठी निस्वार्थी काम करीत होतो. मात्र काही जणांना माझे कार्य खटकत होते. मी कधीही कुणावर दबाव टाकला नाही व मनमर्जी केली नाही. मात्र काही सदस्यांना माझ्याविरुद्ध भडकविण्यात आले. खोट्या आमिषाला बळी पडून अविश्वास दाखल करण्यात सदस्य मनातून तयार नाहीत. सदस्यांनी माझ्या कार्याबाबत असमाधानी असल्याचे सांगितलं असते तर मी स्वतः पदाचा त्याग केला असता. अविश्वास प्रस्तावाला मी आनंदाने समोर जाईल.                                                                                                                                                                                                                                                 मदन खामनकर,उपसरपंच