वासेरा येथील “आझाद का राजा ” मंडळाचा १० दिवसीय सामाजिक उपक्रम

84

सिंदेवाही : भारतात पूर्वीपासून परंपरेने सुरू असलेली गणरायाची पूजा अर्चा करून १० दिवसांनी बाप्पाला निरोप दिल्या जाते. मात्र सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील आझाद का राजा या गणेश मंडळाने १० दिवसांचा आनंदोत्सव साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करणार असल्याचा मानस आझाद का राजा या गणेश मंडळाचे अध्यक्ष कुंदन आहाके, महेश सोयाम, भूषण बोरकर यांनी व्यक्त केला आहे.

.        सद्यस्थितीत गणेश उत्सवाचा मूळ उद्देश हरवला असल्याने त्याला दिखाऊ स्वरूप प्राप्त झाले असले तरी, त्याला सामाजिक बांधिलकी जपणारे काही अपवाद मंडळे आहेत. त्यापैकी आझाद का राजा गणेश मंडळ वासेरा. सर्वसामान्य गणेशोत्सव साजरा करताना भव्य मूर्ती, आकर्षक सजावट, मंडपाचा भव्यदिव्य आकार, रोषणाई, कर्णकर्कश डिजे, साऊंड सिस्टीम, यांच्या गराड्यात अडकून न पडता, काळ बदलला, तसा उत्सवातही बदल करने अपेक्षित आहे. हे मनाशी ठरवून समाजात अंधश्रद्धा, बेरोजगारी, स्वच्छता, गरिबी, या सारख्या असंख्य समस्या वाढल्या आहेत. गणेशोत्सवात लोक प्रबोधन हा महत्वाचा दुवा आहे. आजही समाजाला प्रबोधनाची गरज आहे. हे लक्षात घेऊन आझाद का राजा गणेश मंडळाने १० दिवसीय आनंदोत्सव हा सामाजिक अभिनव उपक्रम राबवून साजरा करीत आहेत. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता बाप्पाला विराजमान व घटस्थापना करून ८ सप्टेंबर रोजी गावातून बाहेर निघणारा मार्ग पूर्णतः स्वच्छ करून रस्त्याचे सुशोभीकरण केले.

.        ९ सप्टेंबर रोजी गावातून बाहेर निघणाऱ्या प्रमुख मार्गांवर दोन्ही बाजूला फायकस प्रजातीच्या शोभिवंत असलेल्या ५० वृक्षाची लागवड, १० सप्टेंबर रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका संघटक अनिल लोनबले आणि डाकेश्वर पर्वते, यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम, ११ सप्टेंबर रोजी गावातील सर्व प्रमुख मार्गांची स्वच्छता, १२ ला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तथा गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, १३ ला गावातील सर्व मंदिरांची साफ सफाई, १४ ला गावातील सर्व सार्वजनिक शौचालय आणि मुत्रिघरांची स्वच्छता करून रंगरंगोटी करणे, १५ ला महिलांकरिता रांगोळी स्पर्धा, १६ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाला निरोप. अशा प्रकारचे सामाजिक हित जोपासणारे उपक्रम राबवून गावांसाठी एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचे काम आझाद का राजा गणेश मंडळाचे वतीने करण्यात येत असल्याचे मत मंडळाचे सल्लागार पोलीस पाटील देवेंद्र तलांडे यांनी व्यक्त केले आहे.