Home सामाजिक वडसा-चांदाफोर्ड, चांदाफोर्ड-गोंदिया रेल्वे पूर्ववत सुरू

वडसा-चांदाफोर्ड, चांदाफोर्ड-गोंदिया रेल्वे पूर्ववत सुरू

1360

खासदार डॉ. किरसान यांनी वडसा ते नागभीड पर्यंत रेल्वेने केला प्रवास

नागभीड : कोरोना महामारी मुळे बल्लारशहा – गोंदिया रेल्वे मार्गांवरील अनेक गाड्या बंद करण्यात आल्या. कोरोना जाऊन काळ लोटला असला तरी बऱ्याच रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या नसल्याने अनेक प्रवाशांना त्याचा त्रास होत होता. त्यामध्ये वडसा – चांदाफोर्ड, चांदाफोर्ड – गोंदिया रेल्वेगाडीचा समावेश होता. वारंवार मागणी करून देखील बंद रेल्वे पूर्ववत सुरु करण्यात आली नसल्याने या संदर्भात गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनियुक्त खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात वडसा – चांदाफोर्ड, चांदाफोर्ड – गोंदिया रेल्वे पूर्ववत सुरु करण्याची मागणी केली. अखेर खासदार डॉ. किरसान यांच्या प्रयत्नाना यश आले असून कोरोना काळात बंद झालेली वडसा-चांदाफोर्ड, चांदाफोर्ड – गोंदिया ही रेल्वे पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.

.       सदर रेल्वे दिनांक 8 सप्टेंबर पासून नियोजीत वेळेवर सुरू झाली. वडसा रेल्वे स्थानकावर सकाळी 7.15 मिनिटांनी खासदार डॉ. नामदेव किरसान तसेच गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे रेल्वेमध्ये बसुन नागभीड पर्यंत प्रवास केला.

.        नागभीड येथील रेल्वे स्थानकावर चिमुर विधानसभा काँग्रेस समन्वयक डॉ. सतिश वारजूकर, नागभीड तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोद चौधरी व नागभीड काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी खासदार व रेल्वे चालक यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. व रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून प्रस्थान केले.

error: Content is protected !!