केंद्रीय कोळसा व खाण मंत्री किशन रेड्डी चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर

21

राजुरा विधानसभेतील वेकोलि बाधित शेतकऱ्यांनी, प्रकल्पग्रस्तांनी आपल्या तक्रारी द्या – देवराव भोंगळे 

राजुरा : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीवरून जिल्ह्यातील वेकोलिच्या संदर्भातील विविध समस्या तसेच मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी देशाचे कोळसा व खाण मंत्री जी. किशन रेड्डी हे लवकरच चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

.        या दौऱ्यात ते वेकोलिच्या विविध विषयांसंदर्भात नागरीकांशी संवाद साधणार असून याकरीता राजुरा विधानसभा क्षेत्रातील वेकोलि बाधित शेतकऱ्यांनी तसेत प्रकल्पग्रस्त नागरीकांनी आपल्या तक्रारी, समस्या यांचे सविस्तर निवेदन तयार करून लवकरात लवकर राजुरा येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा विधानसभा जनसंपर्क कार्यालय येथे आणून द्यावे. असे आवाहन भाजपाचे विधानसभा निवडणुक प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी परीसरातील नागरीकांना केले आहे.