महायुतीच्या सरकारचे महिलाप्रती प्रेम बेगडी

46

बल्लारपुरात महाविकास आघाडीचे आंदोलन

महिला अत्याचारांच्या घटना वाढीवर चिंता

विसापूर : चंद्रपूर जिल्हा व बल्लारपूर शहरात महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटना समाजमन सुन्न करणारी आहे.या घटना दिवसेदिवस वाढत आहे. या घटनावर प्रतिबंध लावण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. यावर चिंता व्यक्त करून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी बल्लारपुरात धरणे आंदोलन केले. धरणे आंदोलनात सहभागी नेत्यांनी महायुतीच्या सरकारचा खरपूस समाचार घेत, राज्य सरकारचे महिलाप्रती प्रेम बेगडी असल्याचा गंभीर आरोप केला.

.      बल्लारपूर तालुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून शुक्रवारी (दि. ६) सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला साक्षी ठेवून धरणे आंदोलन करून महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनेचा तीव्र निषेध केला. सातत्याने घडणाऱ्या अत्याचाराविरोधात काळी मुखपट्टी बांधून चिंता व्यक्त केली. यामुळे ,आता महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, सरकाची यंत्रणा अत्याचारांच्या घटना थांबविण्यात अपयशी होत आहे. याला कारणीभूत राज्य सरकारचा नाकर्तेपणा आहे, असा आरोप आंदोलन कर त्यांनी केला.

.      अलिकडे बल्लारपूर शहरात एकाच दिवशी अत्याचारांच्या दोन घटना घडल्या. यातील अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन जीवनातून मुक्त झाली. तिच्या मारेकर्यांना कठोर शिक्षा द्या, असी मागणी आंदोलनात सहभागी पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार ओंकार ठाकरे यांना सादर केलेल्या निवेदनात केली.

.      आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते घनश्याम मुलचंदानी, संदीप गिरे, विनोद यादव, सुरेश चौधरी, गोंविदा उपरे, देवेंद्र आर्य, भास्कर माकोडे, अफसाना सय्यद, ॲड.मेघा भाले, छाया मडावी, नरसिंग रेब्बावार, बादल उराडे, अब्दुल करीम, इस्माईल ढाकवाला, कल्पना गोरघाटे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.