माजरीत तान्हा पोळा उत्साहात साजरा

462

माजरी : येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंदिरा समोरील भव्य पाटांगणात स्व. नंदुभाऊ धोंडूजी सूर बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य प्रवीण सूर यांच्या वतीने दरवर्षी आयोजित होणारा तान्हा पोळा निमित्त नंदीबैल सजावट स्पर्धा याही वर्षी मोठ्या उत्साह व जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात माजरी कॉलरी आणि माजरी वस्ती येथील ६९ बालकांनी आपल्या नंदीला सजवून तसेच स्वतः आकर्षक वेशभूषा करून तान्हा पोळा अतिशय उत्साहामध्ये साजरा केला.

.      स्पर्धेअंतर्गत एकूण सहा विषयांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये सुरक्षित बालीका व सुरक्षित महिला याबाबत महाराष्ट्रातील उपाययोजना, जागतिक स्तरावरील युध्दामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम, लहान मुलांचे मोबाईल व्यसनाधीनता व त्यावर उपाय, माझ्या दृष्टीने, माझे गांव. आदर्श गांव,  जि. प. शाळेला आदर्श करण्यासाठी काय काय उपाय योजना करता येईल, आपल्या परिसरातील वाढते प्रदूषण व त्यावर उपाय योजना, गावात पुरजन्य स्थिती निर्माण होवू नये म्हणून काय काय उपाययोजना करता येईल?, शेतकऱ्यांची आजची अर्थस्थिती उद्भवण्याचे कारण व उपाययोजना, आपल्या परिसरात वाढते प्रदूषण व त्यावर उपाययोजना इत्यादी विषय आयोजकांकडून ठेवण्यात आले होते.  दरम्यान एकूण सहभागीं पैकी सहा उत्कृष्ट नंदी बैल सजावट आणि उत्कृष्ट वेशभूषेला बक्षीस देण्यात आले. तसेच प्रोत्साहनपर बक्षिसेही देण्यात आली. स्वरा प्रमोद ढगे हिने विशिष्ट वेशभूषा परिधान करून उपस्थितांचे लक्ष वेधले. दरम्यान स्पर्धेत सहभागी सर्व बालगोपाळांना भेटवस्तू संस्थेकडून देण्यात आले. या स्पर्धेत परीक्षक म्हणून वरिष्ठ नागरिक गजानन मांडरे आणि ब्लॅक डायमंड कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका दीपिका मानुसमारे यांनी काम पाहिले.

.      यावेळी कार्यकामाचे अध्यक्ष म्हणून माजरीचे ठाणेदार अमित पांडे, प्रमुख पाहुणे उपसरपंच सोनाली सूर,  ग्रा. पं. सदस्य मारुती पंधरे, अमर जुमडे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप हेकाड, सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश सिंग, प्रशांत हेडाऊ , अमोल अडवे, हरिदास सूर, प्रमोद आस्वले, किसन सूर, अनुज निशाने, वरिष्ठ पत्रकार राजेश रेवते यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक विलास खाडे यांनी केले.