सावरगाव येथे तान्हा पोळा उत्साहात संपन्न

23

नेरी : चिमुर तालुक्यातील सावरगाव येथील हनुमान मंदिर जवळ छोट्या बालगोपालांच्या नदीबैलांचा तान्हा पोळा दि 4 सप्टेंबर ला भरविण्यात आला होता.तान्हा पोळा मोट्या उत्साहाने नदीबैलांच्या उपस्थितीत मोट्या उत्साहाने संपन्न झाला. तान्हा पोळ्यात बालगोपालांना विविध आकर्षक बक्षिसांची मेजवानी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

.         या तान्हा पोळ्याचे आयोजक म्हणून शरद गिरडे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून देवानंद गावडे, तमुस अध्यक्ष, चिंतामण गावंडे उपस्थित होते तर याप्रसंगी गावाचे सरपंच शीतल धारणे, उपसरपंच अजय पराते, ग्रामसेवक समर्थ उराडे, देविदास गिरडे, आणि समस्त गावकरी उपस्थित होते. पोळ्यात बालगोपालांनी नंदी बैलाची खूप सुंदर सजावट करून उपस्थिती दर्शविली होती. यावेळी आकर्षक नदी बैलाला आणि सूंदर वेशभूषा करणाऱ्या बालगोपालांना ईश्वरचिट्टी द्वारे बक्षिसांचे वितरण करण्यात आले प्रसाद वितरणाने तान्हा पोळ्याची सांगता करण्यात आली.