परिश्रमाने यशाला गवसणी घालता येते – ॲड दीपक चटप

22

बल्लारपुरात मराठा सेवा संघाचा कार्यक्रम

मान्यवरांनी केले स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन

विसापूर : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी विविध क्षेत्रातील दालने खुली आहे. प्रगतीची दिशा ठरविण्यासाठी शिष्यवृत्ती महत्वाची आहे. ही संधी विद्यार्थ्यांनी प्राप्त करावी. यासाठी कष्टाची तयारी ठेवावी.परिश्रमाने यशाला गवसणी घालता येते, असे मौलिक मार्गदर्शन ॲड.दीपक चटप यांनी बल्लारपुरात केले.

.      बल्लारपूर येथे तुकाराम महाराज सभागृहात मराठा सेवा संघाच्यावतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या यशवंतांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी चेवनिंग स्कॉलर व सामाजिक कार्यकर्ते ॲड.दीपक चटप यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग सांगितला.

.      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष मनोहर माडेकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून बल्लारपूर चे तहसीलदार ओंकार ठाकरे, मार्गदर्शक ॲड दीपक चटप, डॉ.अनिल शिंदे, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सुरेश पंदीलवार, अनिल वाग्दरकर, प्रा. एन.के.लिंगे, डॉ. सुनील बुटले यांची उपस्थिती होती.

.      दरम्यान यावर्षी विविध शासकीय विभागात नियुक्ती झाल्याबद्दल १५ विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मनोहर माडेकर म्हणाले, अभ्यासिका व वाचनालय मुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. मात्र, शासन व्यवस्था परीक्षा घोटाळे, स्पर्धा परीक्षा पार पडून, देखील निकाल न लावने,परिक्षेच्या वेळापत्रक वारंवार बदल करणे,निकालानंतर नियुक्ती देण्यात दिरंगाई करणे,आदी प्रकारामुळे स्पर्धा परीक्षा देणारे त्रस्त आहेत. हा प्रकार थांबला पाहिजे. चुकीच्या पायंड्यापासून शासन व्यवस्थेने परावृत्त व्हावे, असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन नितीन वरारकर यांनी, तर आभार चंद्रकांत पावडे यांनी मानले. यावेळी राजेंद्र खाडे, रोहित चुटे,योगिता शेडमाके,शोभा माडेकर, मंदा वाटेकर यांच्यासह विद्यार्थ्यांची व पालकांची उपस्थिती होती.