Home सामाजिक विसापुरातील तान्हापोळ्याला आले जत्रेचे स्वरूप

विसापुरातील तान्हापोळ्याला आले जत्रेचे स्वरूप

1379

पंढरीनाथ देवस्थान, मंगल कार्यालयाचे आयोजन 

दोनशेवर बाल शेतकऱ्यांचा सहभाग

विसापूर : आपला देश कृषीप्रधान आहे. याची नाळ ग्रामीण भागात खोलवर रूजली आहे. यामुळे पोळ्याच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण बैल पोळा आहे. तर तान्हा पोळा बाल शेतकऱ्यांचा आहे. कृषी संस्कृती बाल मनावर रुजविण्यासाठी तान्हा पोळा भरविला जातो. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील पंढरीनाथ देवस्थान, मंगल कार्यालयाच्या वतीने आयोजित तान्हापोळ्याला जत्रेचे स्वरूप आले. तब्बल दोनशेवर बाल शेतकऱ्यांनी नंदी बैलासह हजेरी लावली, हे तान्हापोळ्याचे वैशिष्ट्ये ठरले.

.        बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील पंढरीनाथ देवस्थान, मंगल कार्यालयाच्या वतीने परंपरागत तान्हा पोळ्याचे आयोजन मंगल कार्यालयाच्या प्रांगणात केले. यावेळी बाल शेतकऱ्यांनी कल्पकतेने नंदी बैलाची सजावट केली. सजावटीसह प्रबोधनात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला. लाकडी नंदी बैलासह मातीने घडविलेल्या नंदी बैलाची तान्हा पोळयात पुजा-अर्चना केली. तब्बल दोनशेवर बाल शेतकऱ्यांनी हजेरी लावून, त्यांनी कृषी संस्कृतीचे दर्शन घडविले. याला भजनी मंडळीचा सहभाग लाभला. तान्हा पोळ्यात सहभागी सर्वच बाल शेतकऱ्यांचा भेटवस्तू, खाऊ व बालोपयोगी साहित्यांचे वितरण करून सन्मानित करण्यात आले.

.        विसापूर येथील तान्हापोळ्याला जत्रेचे स्वरूप आणण्यासाठी पंढरीनाथ देवस्थान, मंगल कार्यालयाचे प्रमुख माजी सभापती कृउबास व माजी जि.प.सदस्य रामभाऊ टोंगे यांचा मोठा हातभार आहे. यांना सहकार्य उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर कळस्कर, शंकर उपरे, संजय डाहुले, गणेश गोहने, रत्नाकर टोंगे, गणेश टोंगे, अविनाश टोंगे, संजय भोयर, सुभाष भटवलकर, दिनेश क्षीरसागर आदींनी केले.

error: Content is protected !!