शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रमेश पावडे यांची सर्वानुमते निवड

31

वरोरा : तालुक्यातील परसोडा येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ग्रामसभेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यासंदर्भात विषय ठेवण्यात आला.

.      सदर सभेमध्ये जी. प. उच्च प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रमेश लक्ष्मण पावडे यांची तर उपाध्यक्षपदी कविता प्रवीण लभाने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच सदस्यपदी अतुल गारघाटे, मंगेश उताने, शरद बेलेकर, नलिन कळे, राजीव डाखोरे, ललिता कळसकर,रुपाली मडावी, भाग्यश्री पावडे,दिक्षा वाटेकर, कविता लभाने,मीनाक्षी बावणे, सोनाली बावणे यांची निवड करण्यात आली.

.      नवनियुक्त अध्यक्ष रमेश पावडे आणि उपाध्यक्ष कविता लभाने यांनी सर्व सदस्यगण सोबत घेऊन शिक्षणासंबंधी विद्यार्थी व पालकाना भेडसाविणाऱ्या समस्या सोडवून शाळेची उत्तोरोत्तर प्रगती साधण्याचा आटोकाट प्रयत्न केल्या जाईल असे ग्रामस्थांना आश्वासित केले.

.      सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक बंडु बडवे यांनी तर आभारप्रदर्शन कमल येवणे यांनी केले. सभेत शिक्षिका प्राची हिवरकर, रेखा झाडे आणि गावातील माता -पालक उपस्थित होते. शाळा समिती मध्ये निवड झालेल्या सर्व नवनियुक्त पदाधिकारी आणि सदस्यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.