वरोरा तालुक्यात ठिकठिकाणी बैल पोळा उत्सव साजरा

39

वरोरा : पोळा म्हटलं कि बळीराजाचा वर्षातील सर्वात मोठा सण, ज्या बैलावर आपण अख जीवन जगतो त्या बैलाला या दिवशी सजवून धजवून, गावातील चौकात एकत्र ऐकून सर्व गावकरी बैल पोळा भरवत असतात, यावर्षी तालुक्यातील अनेक शेतकरी यांनी वेगळ्या पद्धतीने पोळा साजरा करत आपल्या न्याय हक्काचा मागण्या चक्क बैल यांच्या पाठीवर लिहून, सोयाबीनला सहा हजार भाव मिळालाच पाहिजे, शेतमालाला बेसिक भाव मिळाला पाहिजे, पीक विमा मिळाला पाहिजे तसेच वेगळा मागण्याचे पोस्टर लावून साजरा केला.

.        आज पर्यंत फक्त शेतकरी सरकार सोबत लढत होता मात्र सरकारला शेतकरी यांचे काही देणे घेणे नसल्याने आज शेतकरी यांनी आपल्या जीवापाड प्रेम करणाऱ्या बैल यांना सोबत घेऊन सरकारला हाक दिली.