Home सामाजिक नंदोरी फार्मर प्रोड्युसर कंपनीत वृक्षारोपण

नंदोरी फार्मर प्रोड्युसर कंपनीत वृक्षारोपण

1364

भद्रावती : भारतीय रिझर्व बँकेच्या स्थापनेच्या 90 व्या वर्षात पदार्पणाच्या निमित्ताने भारतीय रिझर्व बँक नागपूर विभाग, जिल्हा अंमलबजावणी कक्ष आणि नंदोरी फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

.        या कार्यक्रमात भारतीय रिझर्व बँक नागपूरचे स. प्र. अधिकारी शुभम खोब्रागडे, स्मार्ट चंद्रपूरचे नोडल अधिकारी नंदकुमार घोडमारे, शेतकरी उत्पादक महासंघ चंद्रपूरचे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, संचालक संदिप एकरे, संचालक कपिल रांगाणकर, प्रकाश निब्रड, सुधाकर जिवतोडे, दादाजी झाडे, सुनील उमरे आणि अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.        कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी वृक्षारोपण केले आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने योगदान देण्याचा संकल्प केला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून पर्यावरणाचे महत्त्व आणि वृक्षारोपणाच्या गरजेवर भर दिला.

error: Content is protected !!