खेमजई येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचा प्रथम वर्धापनदिन व गुणवंत गौरव सोहळा

8

वरोरा : तालुक्यातील खेमजई येथे विकास ग्रुप खेमजई व ग्राम विकास समिती खेमजई यांच्याद्वारा स्थापित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचा प्रथम वर्धापनदिन व गुणवंत गौरव सोहळा २०२४ पार पडला.

.       या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच मनिषा चौधरी ह्या होत्या. तर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून मानवी हक्कांशी निगडित कायद्यांचे पदवीत्तर शिक्षण नार्वे, स्विडन, स्वित्झर्लंड, इंग्लंड या चार देशात घेत असलेले, जागतिक दर्जाची इरॉसमस मुंडूस स्कॉलरशिप प्राप्त स्कॉलर ॲड. बोधी रामटेके हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. राहुल तायडे,  धनंजय साळवे, गट विकास अधिकारी चंद्रपूर, डॉ. सतिश अघडते पशु वैद्यकीय अधिकारी, खेमजई, डॉ प्रमोद गंपावार, ईश्वर टापरे, सहा. शिक्षक खेमजई, चंद्रहास मोरे, उपसरपंच खेमजई, रमेश चौधरी, ग्राम पंचायत सदस्य, खेमजई, विलास चौधरी सामाजिक कार्यकर्ते खेमजई, ॲड अरविंद पेटकर, नरेश ताजने कृषी अधिकारी, विश्वनाथ तुराणकर पोलिस पाटील खेमजई, शंकर धोत्रे अध्यक्ष तं.मु. समिती खेमजई हे होते.

.       कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक ॲड बोधी रामटेके यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणातील नामांकित विद्यापीठात असलेल्या संधी व प्रवेश प्रक्रिया यावर मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच धनंजय साळवे, प्रा.राहुल तायडे, ॲड अरविंद पेटकर,डॉ प्रमोद गंपावार, नरेश ताजने, विलास चौधरी इत्यादींनी सुद्धा गावच्या विकासासाठी विद्यार्थी-पालक व गावकरी यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेत अभ्यास करुन पोलिस शिपाई म्हणून नुकतीच ज्यांची निवड झाली असे महेश श्ररामे व नितेश गजभे तसेच २०२३-२४ या वर्षात गावातून जे तरुण शासकीय व खाजगी नौकरी चांगल्या पदावर रुजू झाली त्यांचा तसेच सन २०२४ मध्ये गावातील दहावी- बारावी मध्ये ७०% वरील गुणासह उत्तीर्ण झालेल्या एकुण १९ खेमजई गुणवंतांचा व कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक ॲड बोधी रामटेके यांचा सन्मान चिन्ह, भारतीय संविधानाचे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती दोहतरे, प्रास्ताविक लंकेश भेले तर आभार प्रदर्शन श्रिकांत कामटकर यांनी केले.