विसापुरातील ‘ त्या ‘ सामाजिक कार्यकर्त्यांचे रक्तदानाचे रौप्य महोत्सवी वर्ष

15

जिल्हा सामान्य रुग्णालयात २५ वर्षापासून रक्तदान

रक्तदान, श्रेष्ठ दानाची अशी ही महती

विसापूर : आपण दान केलेल्या रक्तामुळे गरजूंचा जीव वाचू शकतो. याच अनुषंगाने रक्तदानाला सर्व श्रेष्ठ दान म्हटले जाते. याची जाणिव त्याला झाली. मागील २५ वर्षापासून तो रक्तदान करतो. रक्तदानासाठी तो जिल्हा सामान्य रुग्णालयात जातो. तेथील रक्तपेढीत जाऊन रक्तदान करतो आहे. अलिकडे ‘ त्याने ‘ रक्तदानाचे रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ण केले आहे.

.     बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील ‘ त्या ‘ सामाजिक कार्यकर्त्यांने हि किमया केली आहे. राजेश शंकर गावंडे असे त्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे समाजात कौतुक केले जात आहे.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील राजेश गावंडे हा युवक बल्लारपूर तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समिती चा संघटक आहे. लहानपणापासून त्याला समाजसेवेची आवड आहे. तो नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. राजेश स्वतःच्या जन्मदिन रक्तदान करून साजरा करतो. हा त्याचा उपक्रम मागील २५ वर्षापासून सुरू आहे. यासाठी त्याने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीची निवड केली आहे.

.     राजेश गावंडे हा वाढदिवसाच्या दिवसी जिल्हा सामान्य रुग्णालयात नित्यनेमाने जातो. कधी मित्र, तर कधी एकटाच जाऊन रक्तदान करतो. यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी चे कर्मचारी त्याला आदराने रक्तदान प्रर्कीया करून घेतात. सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरिबांना माझ्या रक्तदानाचा उपयोग व्हावा. ही त्याची भावना आहे. यावर्षी त्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदानाचे रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ण केले आहे. त्याच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे समाजात कौतुक केले जात असून हा प्रवास नेहमीच सुरू राहणार आहे, असे राजेश यांनी सांगितले.

” मी वयाच्या २0 वर्षापासून सलग रक्तदान करीत आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढी जाऊन २५ वर्षापासून रक्तदान करीत आहे. जेव्हा माझ्या रक्तगटाची गरजूला गरज भासते, त्यावेळी मी रक्तदान करतो. रक्तदान शिबीर दरम्यान देखील हे कार्य करत आहे. ”                                                                                                                                                   राजेश गावंडे, विसापूर                                             संघटक, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बल्लारपूर.