कॅप्सूल ट्रक ची रांगच रांग

6

गडचांदूर भोयेगाव मार्गांवर अपघाताची शृंखला सुरुच आहे मागील काही दिवसापूर्वी याच मार्गांवर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला कार धडकली होती. या अपघातात जिवती तालुक्यातील चार युवकाना आपले प्राण गमवावे लागले. गडचांदूर पाटण मार्गांवर असे कॅप्सूल ट्रक रोडावर उभे करण्यात येतात. या ट्रक मालकांना पोलिस प्रशासनाचा आशीर्वाद असल्याचे बोलले जाते. त्यामुळे असे ट्रक रांगेत उभे केले जात असलेल्या वाहनाना कोणीच हटकत नाही. मात्र या उभ्या वाहनाचा वाटसरुना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

                                        (छाया – फारुख शेख, पाटण)