सकल हिंदू समाज तर्फे वरोऱ्यात ऐतिहासिक दहीहंडी महोत्सव

36

वरोरा : सकल हिंदू समाजतर्फे यावर्षी पहिल्यांदा वरोरा शहरात दहीहंडी महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात महाआरतीने करण्यात आली. वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये 90 पेक्षा जास्त स्पर्धेकांनी भाग घेतला उत्कृष्ट वेशभूषेला पारितोषिक देण्यात आले. ज्यात सर्वांना शाळेची बॅग, बुक आणि इतर साहित्य देण्यात आले. आणि विजेत्यांना सायकल देण्यात आली.

.       यावेळी विएचपी अध्यक्ष रोडमल गहलोत, विदर्भ प्रांत प्रमुख राकेश त्रिपाठी, अभिषेक मोटलग, डॉ. सागर वझे, डॉ. विवेक तेला, डॉ. राजेंद्र ढवस, डॉ. रमेश राजूरकर, किशोर टोंगे, चेतन कुटेमाटे, विलास नेरकर उपस्थित होते.

.       त्यानंतर शहरवासियांनी दहीहंडीचा थरार अनुभवला यात शीतला माता मंडळ बाबुपेठ यांना प्रथम पारितोषिक मिळाले तर दुसरे पारितोषिक हनुमान व्यायामशाळा मंडळ वरोरा ला मिळाले तर तिसरे पारितोषिक बजरंगदल शाखा वरोरा यांना मिळाले आणि मंडळाने पारितोषिक गौरक्षनासाठी सुपूर्द केले. सर्व बालगोपाल, माताभगिनी आणि स्पर्धक तसेच वरोरावासी पारंपारिक आयोजनाने सुखावले.