कंगना रनोत यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करा

10

शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

वरोरा : काळ्या कायद्याचा विरोध करण्यासाठी देशातील शेतकरी दिल्ली बॉर्डरवर बसून आंदोलन करीत होते. याच आंदोलन दरम्यान लोकसभा सदस्य कंगना रनोत यांनी शेतकरी हे बलात्कारी आहे असे शब्द बोलून अपमान केला. शेतकर्‍यांबाबत अर्वाच्च भाषेत बोलून शेतकर्‍यांना अपमानित केल्याबद्दल त्याचे लोकसभा सदस्य रद्द करण्यात यावे अशी मागणी शेतकरी किशोर डुकरे यांनी तहसीलदार वरोरा यांना निवेदनातून केली आहे.

.        भारत देश हा कृषिप्रधान देश आहे, देशातील जास्तीत जास्त नागरिक हे शेतीवर अवलंबून असून त्यांचा मूळ व्यवसाय शेती आहे, आणि या शेतमाल विरोधी सरकार ने तीन काळे कायदे आणले होते. या काळ्या कायद्याचा विरोध करण्यासाठी देशातील शेतकरी हा दिल्ली बॉर्डरवर बसून आंदोलन करीत होते. याच आंदोलन दरम्यान लोकसभा सदस्य कंगना रनोत यांनी शेतकरी हे बलात्कारी आहे असे शब्द बोलून अपमान केला तरी शेतकरी यांना अर्वाच्च भाषेत बोलून अपमानित केल्याबद्दल त्याचे लोकसभा सदस्य रद्द करण्यात यावे अशी मागणी शेतकरी किशोर डुकरे यांनी वरोरा तहसीलदाराला दि. २७ ऑगस्टला निवेदनातून केली आहे. यावेळी तालुक्यातील निवेदन देतांनी, विशाल मोरे, नितीन मोरे, हरिदास आसुटकर, चेतन बोरेकर, सतीश मोहर्ले आदी शेतकरी उपस्थित होते.

कंगना रनोत यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी                                                                                                                                                                                                                                                                                                                                                      काळ्या कायद्याचा विरोध करण्यासाठी देशातील शेतकरी हा दिल्ली बॉर्डर बसून आंदोलन करीत होते, याच आंदोलन दरम्यान लोकसभा सदस्य कंगना रनोत यांनी शेतकरी हे बलात्कारी आहे असे शब्द बोलून अपमान केला आहे. तसेच त्यांनी संपूर्ण शेतकरी यांची जाहिर माफी मागावी अन्यथा आठ दिवसात त्यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात येईल. असा इशारा शेतकरी तथा समाजिक कार्यकर्ता किशोर डुकरे व तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.