रानतळोधी येथील आरोग्य शिबीरात 99 नागरिकांनी घेतला लाभ

8

वरोरा : चंद्रपुर जिल्ह्यातील ताडोबा पर्यटन स्थळाचे परिसरात जंगल परिसरात वसलेल्या रानतळोधी गावाचे पुनर्वसन प्रशासनाने वरोरा -चिमूर मार्गांवर एका विस्तीर्ण जागेत केले. सदर गावात बहुसंख्य आदिवासी परिवार वास्तव्यास असून आर्थिक दृष्ठ्या कमकुवत समाज आहे. मेहनती काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. अशिक्षित समाज असून त्यांना आपल्या आरोग्याचे महत्व कळत नाही. त्यामुळे त्यांना आरोग्याचे महत्व कळावे यासाठी गावामध्ये हिरवाई निर्माण करण्यासाठी रानतळोधी गावाला सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नागापुरे यांनी गावातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी 24 आगस्ट ला आरोग्य शिबिराचे आयोजन केले. शिबिराध्ये 99 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.

.       शिबिरात रक्त तपासणी करने, सीबीसी, लिव्हर फक्शन, किडनी फक्शन चाचणी तसेच सिकलसेल, एच पी एल सी, रक्तगट, तपासणी करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रफुल खुजे यांचे मार्गदर्शनाखाली लॅब टेक्नेशियन विक्की भगत, निकिता खुळसंगे, अक्षय, श्रद्धा कुरेकार यांनी मोलाचे सहकार्य केले.

तपासणी दरम्यान उघडकीस आला रुग्णाचा डेंग्यू आजार                                                                                                                                                                                                                                                                                                                                                आरोग्य शिबीर दरम्यान आजार घेऊन खाटेझोपून असलेला रुग्ण राहुल भाऊराव कुमरे हा तपासणी साठी आला. उपस्थित टेक्निशियन चमुंनी त्याची रक्ताची चाचणी घेतली असता त्याला डेंग्यू आजार झाल्याचे लक्षात आले. सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नागापुरे यांच्या सहकार्याने टेक्निशियन विक्की भगत यांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचारार्थ भरती करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टर चमू त्यांचेवर उपचार करीत आहे.

.       आरोग्य शिबीर यशस्वीतेसाठी गावातील महेश कुमरे, सुधाकर कुमरे, हेमंत कुमरे, ग्रा. प. चपराशी कपिल जुमनाके, जी. प. उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक केशव नवघरे, सहा. शिक्षक प्रशांत कराडे यांचे सहकार्य लाभले.