नागरिकांना नाहक त्रास,बँक प्रशासनाचे दुर्लक्ष
चिमूर : शहरात असलेली राष्ट्रीयकृत बँक महाराष्ट्र बँकेचे तालुका भरात हजारो ग्राहक आहेत. यात बँकेच्या कार्यालतीन वेळात दिवसभर मोठी गर्दी बघावयास मिळते. मात्र ग्राहकांना त्यांच्या मूलभूत सुविधेपासून वंचित ठेवण्याचे जणू धोरण बँक प्रशासन करीत असल्याची प्रचिती येते. शहरात बँकेचं एकमेव एटीएम मागील दोन महिन्याच्या कालावधीपासून बंद अवस्थेत असल्याने बँक प्रशासनाच्या कार्यशैली वर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
. चिमूर तालुक्यात महाराष्ट्र बँकेच्या दोन शाखा आहेत. एक शहरात तर दुसरी आंबोली या ठिकाणी सर्वात जुनी राष्ट्रीयकृत बँकेची शहरातील शाखा असल्याने या बँकेची ग्राहक संख्या तालुक्यात मोठी आहे. यातच कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार बँकेत सुरू असतो या मुळे साधी एन्ट्री सुद्धा करविण्यासाठी मागील दोन महिन्यापासून हेलपाटे सोसावे लागत आहे. सेवा अधिक गतिमान करण्याच्या उद्देशाने नवीन नवीन उपाययोजना वरिष्ठ पातळीवरून ग्राहकाकडून शुल्क आकारून पुरविण्यात येतात पण चिमूर परिसरात त्या सेवांचे शुल्क आकारून सुद्धा स्थानिक कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ नियजनामुळे कुचकामी ठरत असल्याची प्रचिती आहे.मागील दोन महिन्यापासून एकमेव असलेलं बँक शाखेच्या नजिकचे एटीएम बंद अवस्थेत आहे.याची शहानिशा करण्यासाठी दैनिक नवजीवन ने बँकेच्या शाखाधिकारी वैशाली गहुकर यांचेशी भ्रमणधवनी वर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
शाखेबाहेरच थाटले खासगी दुकान बँक परिसरात बँक प्रशासनाच्या डोळ्यादेखत एक खासगी ग्राहक सेवा केंद्र थाटले असून विशेष असे की बँक कर्मचारी स्वतः ग्राहकांना त्या ग्राहक सेवा प्रतिनिधी कडे जाण्याचे सांगत असतात.या मुळे जर बँक समोर कर्मचारी जर असे करत असतील तर तालुक्यातील अनेक गावांतील ग्राहक सेवा केंद्रात काय स्थिती असेल,ग्राहक सर्व बाबी पासून अनभिज्ञ असून प्रभावी पणे ग्राहकांना त्यांच्या सेवा मिळत नसल्याचे चित्र आहे.या पूर्वी या शाखाधिकारी भिशी येथे कार्यरत होत्या यांच्या नाहक त्रासामुळे व कुचकामी सेवेमुळे अनेक ग्राहकांनी आपले खाते बंद केल्याची माहिती आहे.
भिसी येथे अनेक वर्षांपासून माझ्या कापड दुकानाचे करंट अकाउंट होते,सुरळीत व्यवहार सुरू होते पण मागे नवीन शाखाधिकारी गहुकर याचे कार्यकाळात नाहक त्रास सहन करावा लागला त्यामुळे मी स्वतः महाराष्ट्र बँक चे खाते कायमस्वरुपी बंद केले आहे. पंकज मिश्रा, माजी अध्यक्ष भीसी व्यापारी अशोशियन, भिसी