विधवा महिलेला शिलाई मशीन व साहित्याचे वाटप

24

राष्ट्रवादी शहर अध्यक्ष आकाश येसनकर यांचा उपक्रम

मूल : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मूल शहर अध्यक्ष आकाश येसनकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील एका निराधार विधवा महिलेला शिलाई मशीन व संबंधित साहित्य भेट देवून समाजसेवेच्या कार्याला एक नवा आयाम देण्याचे काम केले. त्यांनी दिलेल्या मदतीमुळे त्या निराधार महिलेला मोठा आधार मिळाला असून कुटुंबाचा गाडा हाकण्यास मोठी मदत मिळाली आहे.त्यामुळे त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात असून त्यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

.       आकाश येसनकर हे दरवर्षी कुठेही बडेजाव व दिखावा न करता गोर, गरीब, निराधार, यांना एक छोटीशी मदत देवून आपला वाढदिवस साजरा करतात. यावर्षीही त्यांनी विद्या गोवर्धन (गुरनुले) या विधवा निराधार महिलेला मदतीचा हात देवून आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल टाकण्यास प्रोत्साहित केले. त्यांना मिळालेल्या मदतीने विद्या यांना स्वत:च्या व्यवसायाची सुरुवात करण्याची संधी मिळणार असून, ज्यामुळे त्यांचे जीवन अधिक सशक्त व स्वावलंबी होईल. आणि या मदतीमुळे त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक सशक्तीकरणाकडे एक महत्त्वाचे पाऊल उचलले जाणार हे नीच्छित.

.       यावेळी “समाजाच्या उन्नतीसाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत गरजेचे आहेत.महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू.”असे मत राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आकाश येसनकर यांनी व्यक्त केले.गत वर्षी, येसनकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेला शैक्षणिक साहित्य भेट दिले होते आणि वृद्धाश्रमात आपला वाढदिवस साजरा केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या उपक्रमामुळे मूल शहरात समाजसेवेचा एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे मूल तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार,युवक तालुका अध्यक्ष रोहित कामडे,महिला शहर अध्यक्ष धारा मेश्राम, माला शेंडे, उषा शेंडे, रोहित शेंडे, कृणाल चिकाटे, गोलु दहिवले, अक्षय वाळके, सायक खोब्रागडे,अजय दहिवले,आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.