महिला अत्याचाराविरोधात काळ्याफिती लावून महाविकास आघाडीचे जिल्हाभर निषेध आंदोलन

17

चंद्रपूर : देशातील व राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून, महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सरकार मात्र फक्त जाहिरातींवर खर्च करून जनतेला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. या निंदनीय स्थितीविरोधात, बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ, महाविकास आघाडीने आज शनिवारी काळी पट्टी लावून चंद्रपुर शहरासह तालुका व ग्रामीण भागात निषेध आंदोलन केले.

.       चंद्रपुर येथील गांधी चौकात काळी पट्टी लावून महाविकास आघाडीने आंदोलन केले. या आंदोलनात खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) जिल्हा कार्याध्यक्ष बेबी उईके, शहर जिल्हाध्यक्ष दीपक जयस्वाल आणि महाविकास आघाडीतील इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.