वृक्षारोपण करून साजरा केला वाढदिवस

94

भद्रावती : हल्लीच्या काळात वाढदिवस साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे. मग कुणी हा वाढदिवस केक कापून साजरा करतो तर कुणी हॉटेलमध्ये पार्टी करून प्रत्येकाची वाढदिवस साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी असते. पण भद्रावती तालुक्यातील थोराणा येथील ओम मारोती तावाडे या चिमुकल्याने मात्र आपला वाढदिवस तेथीलच जि. प. प्राथमिक शाळा परिसरात वृक्षारोपण करून साजरा केला आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

.         वरोरा येथील लोकमान्य विद्यालयात नवव्या वर्गात शिकत असलेल्या भद्रावती तालुक्यातील थोराणा या गावातील  जि. प. शाळेत पंधरावा वाढदिवस ओमनीने साजरा केला. आधीपासूनच ओमनी आपला वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करायचा असं मनाशी ठरविले होते. समाजाला आपलेही काही देणे लागतो, या भावनेतून ओमचे वडील मारोती तावाडे यांनी वणी येथून फळझाडं आणि फुलझाडांची खरेदी केली. आणि ती झाडं शाळेला भेट देत उपस्थित मंडळी आणि बर्थडे बॉयच्या हस्ते लागवड करण्यात आली. त्यानंतर शाळा वाढदिवसाची भेट म्हणून ओमनी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वितरण केले.

.      यावेळी मुख्याध्यापक अरूण उमरे, बर्थडे बॉय ओम तावाडे, वडील मारोती तावाडे, रमेश भोयर, सहाय्यक शिक्षक ज्ञानेश्वर वाभिटकर, नवयुवक सागर भोयर, ओंकार भोयर, विद्यार्थी, अंगणवाडीची चिमुकली मंडळी, आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मंडळींनी ओमला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अन् त्याचं कौतुकही केलं. ओमनी आपला वाढदिवस झाडं लावून साजरा केल्याने खरोखरच तो पर्यावरण मित्र ठरला आहे. त्यानी आपलं नातं निसर्गाशी जोडलं आहे. त्यामुळे ओमचे कौतुक होत आहे.