वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी सरकारच्या असंवेदनशीलतेचा निषेध!

25

वरोरा : महाराष्ट्रामध्ये महिलांची व युवतीची सुरक्षा अत्यंत दयनिय झालेली असुन देशभरात महिलां व युवती वरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असुन त्याला रोख लावण्यात महाराष्ट्रातील घटनाबाह्य शिंदे सरकार अपयशी ठरत आहे व नुकतीच मुख्यमंत्र्याच्या निवासी जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्यातील बदलापुर येथे एका शाळेत तीन आणि चार वर्षीय चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले.

. याकरीता शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने महाराष्ट्र बंद चे आवाहन करण्यात आले होते. परंतु न्यायालयाने महाराष्ट्र बंद करीता परवानगी नाकारल्यामुळे संविधानाचा व न्यायालयाचा आदर करीत महाराष्ट्र बंद मागे घेतला. महाराष्ट्रातील लेकिंच्या संरक्षणासाठी लढा सुरू ठेवण्याकरीता शिवसेना (उबाठा) पक्षाचे “शिवालय”मध्यवर्ती कार्यालय वरोरा, शिवनेरी कार्यलय भद्रावती तसेच ग्रामीण भागात तोंडाला काळ्या फिती बांधुन व काळे झेंडे दाखवुन चंद्रपूर जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे, जिल्हा महीला सघंटीका नर्मदा बोरेकर यांच्या मार्गदर्शनात व भद्रावती तालुकाप्रमुख आशा ताजने महीला आघाडी तालुका प्रमुख यांचे नेतृत्वात ग्रामीण भागात बदलापुर घटनेचा निषेध करण्यात आला.

. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख रोहन कुटेमाटे, विधानसभा समन्वयक वैभव डहाणे, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, भद्रावती तालुकाप्रमुख नरेद्रं पढाल, युवीसेना सरचिटणीस यशु आरगी, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, शहरप्रमुख खेमराज कुरेकार सह वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.