मनसेच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यात राडा.

43

 

  • राजुरा व चंद्रपूर विधानसभेचे उमेदवार जाहीर पण वरोरा विधानसभा होल्डवर?

 

चंद्रपूर :-

चंद्रपूर जिल्ह्यात मनसेच्या संभावित उमेदवाराची चाचपणी करण्याकरिता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चंद्रपूर च्या एंडी हॉटेल मध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता आले असता त्यांनी चंद्रपूर मध्ये मंदिप रोडे व राजुरा येथे सचिन भोयर यांची उमेदवारी जाहीर केली परंतु मनसेचे खरे काम ज्या वरोरा विधानसभा क्षेत्रात सुरु आहे जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या माध्यमातून जनता दरबार यातून सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवले जातं आहे तिथे उमेदवारी जाहीर झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे, दरम्यान आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला प्रथम प्राधान्य दिले जाईल व त्यालाच उमेदवारी करिता प्राधान्य दिले जाईल असे म्हटले होते, त्यामुळे वरोरा विधानसभा क्षेत्रात राजू कुकडे यांची उमेदवारी जाहीर होईल अशी अपेक्षा होती, परंतु जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे राजू कुकडे यांची उमेदवारी राखडली असल्याचे बोलल्या जातं आहे.

.        राजुरा विधानसभा क्षेत्राची उमेदवारी ही सचिन भोयर यांना जाहीर होताच जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश बोरकर यांच्या समर्थकांनी राडा करून हाणामारी केली, सचिन भोयर ज्याअर्थी चंद्रपूर शहराचा अध्यक्ष असतांना त्याला राजुरा येथे उमेदवारी देण्याचं काय लॉजिक आहे हे कळायला मार्ग नसून ज्याचे स्वतःचं मतदान राजुरा विधानसभा क्षेत्रात नाही आणि राजुरा क्षेत्रात काम नाही त्या सचिन भोयर याला उमेदवारी का दिली म्हणून प्रकाश बोरकर यांच्या समर्थकांनी राडा केल्याचे बोलल्या जातं आहे, महत्वाची बाब म्हणजे राज ठाकरे सभागृहाच्या बाहेर जाताच हा राडा झाला तेंव्हा अमित ठाकरे हॉल मध्ये होते अशी माहिती आहे.