समाजाचा विकास साधताना विश्वास प्रभावी माध्यम

15

कृष्णाजी यादव यांचे प्रतिपादन 

समाजभूषण पुरस्काराने केले सन्मानित

विसापूर : आपला समाज असंघटीत आहे. समाज संघटीत झाला पाहिजे. संघटीतपणामुळे निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते. आपण स्वयंपूर्ण झाले पाहिजे. आपल्यावरील अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे. आपण समाज बांधवांनी महत्वकांक्षा बाळगली पाहिजे. यासाठी विश्वासाने वाटचाल करावी. समाजाचा विकास साधताना विश्वास प्रभावी माध्यम आहे,असे मौलिक मार्गदर्शन समाजभूषण पुरस्काराचे मानकरी व जेष्ठ समाजसेवक कृष्णाजी यादव यांनी रविवारी गोल्ला,गोलकर समाजाच्या मेळाव्यात केले.

.        चंद्रपूर जिल्हा गोल्ला, गोलकर समाजाचा मेळावा रविवारी पंचतेली हनुमान मंदिर सभागृह, जटपुरा,वार्ड चंद्रपूर येथे पार पडला. या मेळाव्यात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा, सेवानिवृत्त झालेल्या मान्यवरांच्या, समाजातील पुरस्कार प्राप्त बांधवांचा आणि गोल्ला,गोलकर समाजातील जेष्ठ समाजसेवक कृष्णाजी यादव यांचा समाजभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते.

.        मेळाव्याचे उदघाटन बल्लारपूर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कांक्रेडवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनोहर बोदलकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून कृष्णाजी यादव, पुरूषोत्तम कोमलवार, प्राचार्य गंगाराम नर्मलवार, व्यंकटेश बंडर्रेवार, शुभम कोमरेवार, डॉ. महेंद्र वर्धलवार, संतोष बोलुवार यांची उपस्थिती होती. दरम्यान समाजाच्या वतीने जेष्ठ समाजसेवक कृष्णाजी यादव यांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रदान करून समाजभूषण पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

.        यावेळी डॉ. महेंद्र वर्धलवार म्हणाले, आपण समाज बांधवांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. हा सत्कार त्यांना प्रेरणा देणारा आहे. यामुळे त्यांच्यात नवी ऊर्जा निर्माण होते, असे सांगितले. शुभम कोमरेवार, प्राध्यापक संतोष बोलुवार, मनोहर बोदलवार,दीपक कांक्रेडवार यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून जिल्हा अध्यक्ष अजय मेकलवार यांनी समाजाच्या हितासाठी मेळाव्याची भूमिका विषद केली.

.        संचालन प्राध्यापक शंकर मद्देलवार व प्राचार्य मनोहर कोपुलवार यांनी केले. आभार दिलीप मकलवार यांनी मानले. यावेळी महेश मकलवार, किरण चेनमेनवार, श्यामराव भंडारी, प्रविण भीमणवार, कृष्णाजी दाऊवार, विजय दंडीकवार, विवेक गुडलावार यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.