शिक्षणाधिकार्‍यांनी शाळेला भेट दिल्याशिवाय शाळा उघडू देणार नाही 

11

सिंदेवाही शाळा व्यवस्थापन समितीची स्पष्टोक्ती

सिंदेवाही : मागील तीन दिवसांपासून सिंदेवाही येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ ही कुलूप बंद अवस्थेत असून शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे  विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापन समितीने नवीन इमारती साठी शाळा बंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाची दखल घेत सिंदेवाहीचे गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे आंदोलनस्थळी पोहचले. आणि शाळा सुरू करण्यासंबंधी शाळा व्यवस्थापन समिती सोबत चर्चा केली. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी अथवा शिक्षणाधिकारी यांनी शाळेला भेट देवून शाळेची पाहणी केल्याशिवाय शाळा उघडू देणार नाही. अशी भूमिका शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी घेतली आहे.

.        जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदेवाही क्र.१ ही शहरातील राम मंदिर परिसरात असून मागील १२९ वर्षा पूर्वी शाळेच्या इमारतीचे बांधकाम केले आहे. त्यामुळे इमारत पूर्णतः जीर्ण झाली असून कोसळण्याच्या मार्गावर आहे. नवीन शाळेची इमारत मंजूर करण्यात यावी. म्हणून शासन प्रशासन यांना अनेकदा समितीने पत्रव्यवहार केला. मात्र पत्रव्यवहाराची कोणतीही दखल घेतली नसल्याने अखेर शाळा व्यवस्थापन समितीने शाळा बंद आंदोलन करून शाळेला कुलूप ठोकले. या शाळा बंद आंदोलनाची दखल घेत गटशिक्षणाधिकारी यांनी सोमवारी दुपारी शाळेला भेट दिली. आणि समितीचे अध्यक्ष मिथुन मेश्राम यांचेसोबत चर्चा केली. यामध्ये सदर शाळेला दोन खोल्यांची इमारत बांधकाम करण्यासाठी निधी मंजूर झाला असून बांधकामाची ई निविदा करून कंत्राटदारांना काम दिले आहे. त्यामुळे निर्लीखीत झालेली इमारत पाडून काम सुरू करण्यासाठी समितीने सहकार्य करावं. अशी चर्चा यावेळी करण्यात आली.

.        मात्र जीर्ण झालेल्या सर्व इमारती पडणार आहात का? तसेच शाळेचे बांधकाम लगेच सुरू करणार आहात का ? याबाबत आपण समितीला लेखी आश्वासन द्यावे. नंतर शाळेचे कुलूप उघडण्यात येईल. असे समितीचे म्हणणे होते. मात्र गटशिक्षणाधिकारी पिसे हे कोणतीही लेखी देण्यास तयार नसल्याने अखेर जिल्हा परिषद चे मुख्यकार्यकारी अधिकारी अथवा शिक्षणाधिकारी यांना शाळेची पाहणी करण्यासाठी आंदोलनस्थळी बोलवा. नंतरच शाळेचे कुलूप उघडण्यात येईल. असा पिसे यांना आग्रह करण्यात आला. व त्यासाठी समितीच्या वतीने लेखी निवेदन सुद्धा देण्यात आले. प्रशासन आणि शाळा व्यवस्थापन समिती यांचे मधील चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या आंदोलन स्थळी गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे, पोलीस निरीक्षक विजय राठोड, समितीचे अध्यक्ष मिथुन मेश्राम यांचे दरम्यान सविस्तर चर्चा झाली.

संबधित कंत्राटदार हे स्वतः निर्लीखित झालेली इमारत पाडून त्या ठिकाणी त्वरित दोन खोल्यांची इमारत बांधकाम करणार आहेत . उर्वरित बांधकामाचा प्रस्ताव जिल्हा परिषद कडे पाठविला आहे. असे सांगितले असता समितीचे अध्यक्ष हे आम्हाला लेखी द्या. तोंडी आश्वासनावर समिती समाधानी नाही. असा आग्रह केला. मात्र मला लेखी द्यायचे कोणतेही अधिकार नसल्याने मी लेखी दिले नाही. तेव्हा समितीचे अध्यक्ष हे शाळेच्या ठिकाणी मुख्यकार्यकारी अधिकारी अथवा शिक्षणाधिकारी यांना बोलवा. असा आग्रह केल्याने मी त्यांना निवेदन देण्यास सांगितले. तसे समितीने निवेदन सुद्धा दिले असून मी वरिष्ठ अधिकारी यांना पाठविले आहे.                                                                                                                                                                                                                                           किशोर पिसे                                                                                                                                                                             गटशिक्षणाधिकारी ( प्रभारी)                                                                                                                                                                     पंचायत समिती सिंदेवाही.