पुनर्वसित रानतळोधी येथे विविध प्रजातीच्या फळझाडांचे वृक्षारोपण

8

रानतळोधी गावाला दत्तक घेऊन हिरवेगार करण्याचा प्रमोद नागापुरे यांचा संकल्प

वरोरा : प्रत्येक समाज घटकांशी सलोख्याचा संबंध ठेवून त्यांना भेडसाविणाऱ्या समस्यांना वाचा फोडून न्याय मिळवून देणे तसेच गावांतर्गत उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न आणि कोणत्याही कार्यक्रम प्रसंगी दानधर्म गुणअंगीकारून सढळ हाताने मदत करणे, कोणताही राजकीय लवलेश न ठेवता समाजकार्याचा वसा घेणारे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नागपुरे यांनी वरोरा तालुक्यातील पुनर्वसीत रानतळोधी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वृक्षारोपण च्या कार्यक्रमाचे आयोजित कार्यक्रमात विविध प्रजातीचे फळझाडे भेट देऊन रानतळोधी गाव हिरवेगार करण्यासाठी दत्तक घेण्याचा संकल्प सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नागापूरे यांनी केला.

.       जीवन जगत असताना समाजाला आपणाकडून काही देणं लागतं! उपेक्षित समाज आणि गावातील समस्याचा विळखा व विविध उपक्रम आणि कार्यक्रम आदि कामे आर्थिक अभावामुळे अडकतात. यातच गावाचा विकास खुंटतो. नेमका समाजकार्यातून ग्रामविकासाचा धागा पकडत सामाजिक कार्यकर्ते प्रमोदजी नागापूरे. यांनी उपेक्षित गावांकडे आपला समाजकार्याचा मोर्चा वळवीला. गावाविकासाच्या प्रवाहात वाहून गेले. रानतळोधी हा गाव ताडोबा जंगल परिसरात होता.हीस्त्र पशु, प्राण्यापासून नागरिकांना धोका होता त्यामुळेजिल्हा प्रशासनाने सदर गावाचे पुनर्वसन वरोरा तालुक्यातील वरोरा चिमूर मार्गावर एका विस्तीर्ण जागेवर गावाचे पुनर्वसन केले आहे. याच गावाला हिरवेगार करण्याचे दृष्टीने पूर्ण गावच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नागापूरे यांनी दत्तक घेण्याचा संकल्प घेतला आणि शाळेतील आवारात परसबाग फुलवण्याकरिता नागापुरे यांनी फणस, आंबा, रामफळ, पेरू, जांभूळ, डाळींब, करवंत, आवळा, लिंबू, अशी 40 फळझाडे शाळेला भेट देऊन शाळेमध्ये 17 ऑगस्ट ला वृक्षारोपण करण्यात आले असल्यामुळे, ग्रामस्थ आनंदी झाले.

.       जिल्हा परिषद शाळेतील वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती वरोरा ज्ञानेश्वर चहारे, शिक्षण विस्तार अधिकारी श्वेता लांडे, मुख्याध्यापक केशव नवघरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा अरुणा नन्नावरे, कराडे, वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलकंठ शेडमाके, सामाजिक कार्यकर्ते प्रमोदजी नागापूरे आदींची उपस्थिती होती.

.       कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक केशव नवघरे यांनी केले. कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी चहारे, शिक्षण विस्तार अधिकारी श्वेता लांडे, प्रमोद नागापूरे, अरुणा नन्नावरे, नीलकंठ शेडमाके,आदींनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थी तथा ग्रामस्थांना वृक्षारोपणाचे महत्व पटवून दिले.

.       वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अंतकला मसराम, शिल्पा कोवे, कविता सिडाम, सचिन कुमरे, कालिदास आत्राम, सीमा कुडमेथे सह सुधाकर कुमरे, आनंद सिडाम, मारोती जुमनाके, भारत सराटे, रमेश सराटे, गुरूदास कोवे, मोरेश्वर आत्राम, रंगनाथ कोवे, संदीप सरांटे यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन कराडे यांनी केले.