वरोरा : महसूल पंधरवडा 2024 अंतर्गत ‘महसूल पंधरवडा शुभारंभ व मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना’ प्रचार प्रसिद्धी करणे व योजना लाभार्थी नोंद करणे याकरिता वरोरा तालुका मधील नवीन पळसगाव सिंगरू या आदिवासी पुनर्वसित गावात महसूल विभागाद्वारे कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे.
. 2019 रोजी नवीन पळसगाव सिंगरू गाव पुनर्वसित झाल्यापासून डिजिटल सातबारे नसल्या कारणाने इतर योजनांच्या लाभापासून वंचित होते. मागील वर्षभरापासून जिल्हाधकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात या कामास प्राधान्य देऊन डिजिटल सातबारा निर्माण करण्यात आले व आज एक ऑगस्ट या महसूल दिनाच्या निमित्ताने डिजिटल सातबारा निःशुल्क प्रत वाटप करण्यात आले. डिजिटल सातबारा निर्माण झाल्यामुळे आता तेथील शेतकऱ्यांना पीक कर्ज, पिक विमा, पी एम किसान योजने लाभ, शेतावरील सौर कृषी पंप योजना लाभ, एम एस ई बी लाईट कनेक्शन ई योजनांचा ऑनलाईन लाभ घेता येणार आहे. तर याच गावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत सर्व पात्र महिला भगिनींचे नावे नोंद करण्यासाठी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, बालविकास प्रकल्प अधिकारी हजर होत्या.
. मतदान नोंद नसलेल्या पाच ते सहा महिला मतदार नोंदणी करून घेण्यात आली. तसेच इतर निवडणूक विषयक मतदार यादी विषयक समस्या निराकरण करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, नायब तहसीलदार निवडणूक हजर होते. सदर ठिकाणी सेतू केंद्र, पीएम किसान नोंदणी, रेशन कार्ड विभाग यांचे कॅम्प लावण्यात आले आहे.
. सदर कॅम्प करिता उपविभागीय अधिकारी वरोरा डॉ. शिवनंदा लंगडापुरे, तहसीलदार वरोरा योगेश कौटकर, नायब तहसीलदार लोखंडे, निवडणूक नायब तहसीलदार मसराम, मंडळ अधिकारी श्रीरामवार, गावचे पोलीस पाटील,तलाठी अलका धोटे, निवडणूक लिपिक जीवतोडे, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू केंद्र संचालक राकेश इखार उपस्थित होते.


