विजेचा लपंडाव थांबवा अन्यथा जनआंदोलन करू

20

शिवसेनेचे वीज वितरण कंपनीला निवेदन

नागभीड : नागभीड नगर परिषद क्षेत्रातील ओम नगर प्रभाग क्रमांक 6 व तुकुम,तिवर्ला प्रभाग क्रमांक 8 या परिसरात विद्युत पुरवठा, कोदेपार मिंडाळा फिडर वरून सुरू असल्यामुळे, सदर परिसरात नेहमीच विजेचा लपंडाव सुरू असतो, रात्रीच्या वेळेस तर हमखास विद्युत पुरवठा खंडित होतो, पावसाळ्याच्या दिवसात तर साप, विंचू इत्यादी विषारी प्राणी घरात शिरकाव करीत असतात त्यामुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. जर सदर परिसरातील विद्युत पुरवठा नागभीड येथील टी पॉईंट फिडरला जोडला तर विजेची समस्या बऱ्याच प्रमाणात निकाली निघू शकते, आणि परिसरातील नागरिकांना विजेच्या समस्यांपासून दिलासा मिळू शकतो.

.       जर येत्या पंधरा दिवसांत सदर समस्या निकाली काढण्यात आली नाही तर नागभीड शिवसेनेतर्फे मोठा जनआंदोलन करण्याचा इशारा मनोज लडके शिवसेना तालुका प्रमुख यांनी आपल्या निवेदनातून दिला आहे, यावेळेस शहर प्रमुख श्रीकांत पिसे, उप-तालुका प्रमुख अस्मिक उरकुडे, शाखा प्रमुख पंकज कोरडे, शाखा प्रमुख चेतन ढोंगे, शाखा प्रमुख विनोद लांजेवार, शाखा प्रमुख शरद सहारे तसेच बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.