खंडणी साठी त्यांनी ठेवला होता कपड्याच्या दुकानात बनावट बॉम्ब

42

अखेर गडचांदूरकरानी घेतला सुटकेचा श्वास

दोन जुड्या भावांना अटक

गडचांदूर : लोकांचं असलेल कर्ज फेडण्यासाठी चिमुरातील दोन जुड्या भावंडानी गडचांदूर येथील भगवती एनएक्स कापड दुकानात लीप लीप करणारा लाईट चा खिलोना एका थैलीत ठेवला आणि त्यात बॉम्ब असल्याचे सांगून दुकानदारा कडून खंडणी वसुल करण्याच्या प्रयत्नात असलेल्या जुड्या भावंडाचा डाव फसला आणि पोलीसाच्या जाळ्यात अडकले. मात्र या बॉम्ब च्या अफवेने साऱ्यांचीच दांदल उडाली हे मात्र खरे.

.       गडचांदूर येथील संविधान चौक येथील ‘भगवती NX’या कापड दुकानासमोर 30 जुलै रोजी दुपारच्या सुमारास बॉम्ब ठेवल्याची घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखा LCB चंद्रपूर व गडचांदूर पोलिसांनी काही तासांतच दोन तरूणांना अटक केली असून आयुष धाबेकर (23), पियुष धाबेकर (23), दोघेही रा. चिमूर असे आरोपींच. नावे असून सदर गुन्हेगार हे जुडवे भावंड असून  परिसरात प्लमबिंग चे काम ३ महिन्यापासून करत होते.

.       आरोपीने  दुकानात बॉम्ब ठेवल्याची माहिती कापड दुकानानाचे मालक शिरीष सुर्यकांतराव बोगावार यांना दूरध्वनीवरून दिली होती.  बोगावार यांनी गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांना सदरची माहिती दिली. घटनेची गंभीरता लक्षात घेता  ठाणेदार गडचांदूर यांनी लगेच पोलीस स्टॉप पाठवून दूकानासमोर झडती घेतली असता त्याठिकाणी एक संशयास्पद स्थितीत ठेवलेली एक कापडी पिशवी दिसून आली. दूरून पाहीले असता त्यामध्ये लाईट टिपटिप करीत असल्याचे निदर्शनास आले.

.       त्यावरून ठाणेदार कदम यांनी सदरची माहीती जिल्हा पोलीस अधीक्षक, यांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, हे स्वतः तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच बॉम्बस्कॉट BDDS पथक चंद्रपूर व गडचिरोली यांना पाचारण करण्यात आले. त्याच्या सहाय्याने सदर बॉम्ब निकामी करण्याचे काम राबविले.

.       दरम्यान आरोपीच्या शोध कामी गडचांदूर पोलीस स्टॉप व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, उपविभाग गडचांदूरातील वेगवेगळी पथके तयार करून रवाना करण्यात आली. त्यावेळी घटनास्थळा बाहेरील सीसीटीव्ही CCTV फूटेज व कौशल्यपूर्ण, तांत्रिक तपास करून चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन गडचांदूर, यांनी 2 संशयित इसमांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी त्यांच्यावर असलेल्या कर्जामूळे दूकानदाराला फोनकरून खंडणी मागण्याच्या उद्देशाने सदरचे कृत्य केल्याचे कबूल केले आहे . सदर प्रकरणाबाबत भारतीय न्याय संहिता कलम 308(5)बिएनएस गुन्हा दाखल  नोंद करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार शिवाजी कदम करीत आहेत.