वरोऱ्यात ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिगारे ; नागरिक त्रस्त

23

जनतेचे आरोग्य धोक्यात

वरोरा : शहरातील अनेक भागात कचऱ्याचे ढिगारे पाहायला मिळत आहे. तसेच नाल्यांमधून बाहेर काढलेला कचरा लवकर उचलला जात नसल्याने तो पुन्हा नालीमध्ये जाऊन नाल्या तुंबण्याचे प्रकार सुरू आहे. – दरम्यान या प्रकारामुळे घाणीच्या साम्राज्यात वाढ होत असल्याने डेंग्यू, मलेरिया, अतिसार यासारखे आजार वाढण्याची भीती त्रस्त नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

.       वरोरा शहराच्या बाजारपेठेत – अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे – साचून असल्याचे दिसून येते. तसेच आठवडी बाजार आणि मटन मार्केट परिसरात सर्वत्र कचरा आढळून येतो. अनाज मार्केटसह इतर ठिकाणच्या नाल्यांमधून काढलेला कचरा आणि घाण लगेच उचलली जात नसल्याने ती पुन्हा नालीमध्ये जाऊन नाल्या तुंबण्याचे प्रकार होत आहे. कचऱ्यामुळे नाल्या तुंबल्या असल्याने त्यातून पाणी वाहून जात नाही. परिणामी सुरू असलेल्या संततधार पावसाचे पाणी लगतच्या नागरिकांच्या घरात आणि रस्त्यावर साचत आहे. तसेच अनेक मुख्य रस्त्यावर पावसाच्या पाण्यासोबत नाल्यांमधील कचरा आल्याचे पाहायला मिळत आहे.

.       या प्रकारामुळे शहरातील अनेक भागात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. शहरात डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण आढळले असताना नगरपालिकेकडून स्वच्छता अभियानाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आजाराचे प्रमाण आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने नागरिक घाबरलेल्या अवस्थेत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन चौकशी करावी. तसेच स्वच्छतेवरील खर्चाचे ऑडिट करावे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.