पंचनाम्यासाठी महसूल विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर

26

आमदार भांगडियानी दिले पंचनामे करण्याचे निर्देश*

काजळसर अडेगाव( को) बोथली येथील शेकडो एकर भात पिकाची नासधूस

नेरी : सतत च्या मुसळधार पावसाने नदी नाले भरभरून ओसंडून वाहत असताना तिसऱ्यांदा महापूर आला तसेच मामा तलाव सुद्धा ओव्हरफ्लो वाहू लागल्याने नेरी वरून जवळ असलेल्या काजळसर अडेगाव (को) बोथली येथील शेतपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले अनेक भात पीक वाहून गेले तर काही पीक गाळाखाली दबले गेले यामुळे शेकडो एकरातील पीक जमीनदोस्त होत नष्ट झाले तेव्हा काजळसर येथील शेतकऱ्यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया याना पुराने उद्धवस्त झालेल्या पिकांचीमाहिती देताच तात्काळ महसूल विभागाला शेत पिकाची पाहणी करून पंचनामा करण्याचे निर्देश देताच महसूल विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून पंचनामा केला शेतकऱ्यांच्या हाकेला आमदार भांगडिया यांनी साद दिल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केला जात आहे.

.        सततच्या मुसळधार पावसाने काजळसर येथील मामा तलाव मोठया प्रमाणात ओव्हरफ्लो झाला त्यामुळे मार्गातील अनेक ठिकाणच्या पाळी फोडीत पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसले या पाण्याच्या वेगाने अनेक पीक उपडून वाहून गेले तर काही गाळीमुळे जमिनीखाली दबून नष्ट झाले यात शेकडो एकरातील पीक नष्ट झाले त्याच प्रमाणे अडेगाव (को) येथील मोटा तलाव व मुंडा तलावाच्या ओव्हरफलो पाण्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याने हैदोस मांडीत अनेक एकरातील पीक जमीनदोस्त केले यात अनेक शेतकऱ्यांची रोवणी सुद्धा झाली होती त्यामुळे खूप मोठे नुकसान झाले बोथली येथील नदी नाल्याला पूर आल्याने शेकडो एकराचे पीक वाहून गेले सदर बाब शेतकऱ्यांनी आमदार बंटी भांगडिया याना कळविताच त्यांनी महसूल विभागाला नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामा करण्याचे निर्देश दिले तसेच भाजपा नेरी जी प सर्कल प्रमुख संदीप पिसे यांना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत उपस्थित राहून शेतकऱ्यांची मदत करण्याची व अधिकारी वर्गाला सहकार्य करण्याच्या सूचना दिली.

.        आमदारसाहेबांच्या सूचनेनुसार महसूल विभागाचे नेरीचे मंडळ अधिकारी अशोक कुंभरे, तलाठी सुहास क्षीरसागर, सह्ययक संजय पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. यावेळी संदीप पिसे नेरी जी प सर्कल प्रमुख पिंटू खाटीक भाजपा महामंत्री यांनी अधिकारी वर्गाला हातभार लावीत मदत केली सदर नुकसान ग्रस्त क्षेत्राची पाहणी करून पंचनामे केले. यावेळी खटू हटवादे, दिलीप खोब्रागडे, नंदू हटवादे, हरिदास मडावी, नामदेव हटवादे, रमेश हटवादे, बालाजी वाटगुरे, शंकर हटवादे, धनंजय हटवादे, दिलीप हटवादे, भिका हटवादे, नाकाडे, हिरामण गेडाम आदी सह काजळसर अडेगाव येथील अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते