राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनविश्वास सप्ताह रक्तदान शिबिराने संपन्न

517

मुल : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस जनविश्वास सप्ताह म्हणून राबविण्यात येत आहे. मुलं तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करीत जनविश्वास सप्ताह राबविण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षप्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस मुलं तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबीर घेऊन साजरा करण्यात आला.

.         शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी रिबीन कापून रक्तदान शिबिराचे उदघाटन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार, मुलं शहर अध्यक्ष आकाश येसनकर, युवक तालुका अध्यक्ष रोहित कामडे, महिला तालुका अध्यक्ष संगीता गेडाम, शीतल वाढगुरे, मालाताई शेंडे,प्रशांत मेश्राम, महेंद्र कोडापे, उमाजी चुधरी उपस्थित होते. शिबिरात 35 रक्तदात्यांनी रक्तदान करीत उस्फुर्त सहभाग नोंदवाला. रक्त संकलन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर ची चमू हजर होती.

.         रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आनंदाराव गोहने, सुरज गिरडकर, आदित्य गेडाम, रोहित शेंडे, महेंद्र कोडापे, रितिक शेंडे, अरविंद सोनटक्के, संकेत गेडाम, यश कुंभारे, विश्वास कोल्हे, गोलु दहिवले, रितिक चोखाद्रे, अश्विन गरपल्लीवर, साहिल बारसागडे, रुपेश मेश्राम, प्रशांत रायपरे, तुषार बांबोळे, आकाश खोब्रागडे, साहिल खोब्रागडे, आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.